Sharad Pawar and Ajit Pawar Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

pune political news : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यात नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.

Akshay Badve

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटल्याची सूत्रांकडून माहिती

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुन्हा महाविकास आघाडीकडे

चिन्हावरून दोन्ही पक्षात मतभेद

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युतीची चर्चा सुरू असताना मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे मोर्चा वळवला आहे.

दोन्ही राष्ट्रवादीची युती फिसकटल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा आघाडीमध्ये आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याच्या शक्यता जवळपास संपुष्टात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

अजित पवारांकडून घड्याळाच्या चिन्हासाठी आग्रह आहे. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारीवर ठाम आहे. दोन्ही पक्षात चिन्हावरून मतभेद झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय निश्चित होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची तातडीची बैठक सुरू आहे. या बैठकीला शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होत आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

तत्पूर्वी, शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडून महाविकास आघाडीच्या बैठकीला पोहोचली. या बैठकीसाठी केवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बोलावलं होतं. गुप्त ठिकाणी ही बैठक झाली. या बैठकीला शरद पवार गटाचे नेते हजर राहिल्याने अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा पुढे आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि इंडिगो विमानाच्या पंखांची टक्कर

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

SCROLL FOR NEXT