court News  Saam tv
मुंबई/पुणे

Pune : एकतर्फी प्रेमातून कांड, राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून, आरोपीला जन्मठेप

Pune court News : पुण्यातील बिबवेवाडी येथे एकतर्फी प्रेमातून १५ वर्षांच्या राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी शुभम भागवत याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Namdeo Kumbhar

Pune Crime Latest News : १५ वर्षांच्या राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा २२ वर्षांच्या शुभम याने निर्घृण खून केला होता. एकतर्फी प्रेमातून शुभम याने मुलीचा गळा चिरून धड शिरापासून वेगळे केले होते. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी शुभम याला जन्मठेप अन् ५ हजार रूपयांचा दंड ठोठावलाय. २२ ऑक्टोबर २०२१ मध्ये पुण्यातील बिबवेवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. २२ वर्षाच्या शुभमच्या प्रेमाला १५ वर्षाच्या मुलीने स्पष्ट शब्दात नकार दिला. हा राग मनात धरून शुभमन याने तिचा जीव घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. मंगळवारी कोर्टाने शुभम याला जन्मठेपेची शिक्षा सुनवाली.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला.

शुभम ऋषीकेश बाजीराव भागवत असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे गुन्हेगाराचे नाव आहे. खून झालेल्या मुलीच्या चुलत बहिणीने याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे २०२१ मध्ये शुभम याने त्या मुलीची हत्या केली होती. २२ वर्षाचा शुभमने आठवतील मुलीचा खून केला.त्याला कारण म्हणजे प्रेमात मिळालेला नकार हे होते. त्याशिवाय तिने शुभमसोबत फोनवर बोलणेही टाळले होते. त्यामुळेच रागाच्या भरात २२ ऑक्टोबर रोजी आरोपी शुभम याने त्या मुलीवर चाकूने २२ वेळा वार केले. त्यानंतर गळा चिरून मुलीचे धड शरीरापासून वेगळे केले होते.

मृत मुलीच्या बहिणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरूवात केली. त्यांनी पुरावे गोळे केले. त्यांनी या प्रकरणात २२ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. काही प्रत्यक्षदर्शींनी आरोपीची कोर्टात ओळख पटवली. शुभमच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली. दरम्यान, मृत मुलगी ही आईवडिलांचे एकुलते एक अपत्य होती असा युक्तिवादही विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंजाड यांनी कोर्टात केला. न्यायाधीशाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनवाली. ते म्हणाले की, पोस्टमार्टम रिपोर्ट्नुसार मुलीच्या मृतदेहावर २५ जखमा आढळल्या. या गुन्ह्यासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेप या दोनच तरतुदी आहेत. जन्मठेपेची शिक्षा ही आरोपीसाठी योग्य शिक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT