Key evidence recovered through a virtual panchnama helped police crack the Nasrapur case. saam tv
मुंबई/पुणे

लपवलेल्या गोष्टी अन् गाठीशेवचे तुकडे! नसरापूर प्रकरणातील ‘व्हर्च्युअल पंचनामा’ मुळे उकलले अनेक गूढ

How Virtual Panchnama Works In Criminal Investigation: नसरापूर येथील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणात ‘व्हर्च्युअल पंचनामा’ या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे उघड केले. गाठीशेव, सीसीटीव्ही आणि डिजिटल तपासामुळे आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात यश.

Akshay Badve

पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी "व्हर्च्युअल पंचनामा" करण्याचा नवीन पर्याय वापरला असल्याची माहिती आता समोर आली आहे. अशा संवेदनशील गुन्ह्यात पारंपरिक पद्धतीऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘व्हर्च्युअल पंचनामा’ करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला काल पुण्याच्या विशेष न्यायालयाने दोषी जाहीर केलं आहे. १ मे रोजी घडलेल्या या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या नेतृत्वात तयार केलेल्या विशेष पथकाने पूर्ण केला. या विशेष पथकात पोलिस उपअधीक्षक राजेंद्र मायने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलिस निरीक्षक विजयमाला पवार आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभाग होता. घटना घडल्यापासून अवघ्या पावणे २ महिन्यात या खटल्याचा निकाल गुरुवारी लागला. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेले हे पहिलं प्रकरण म्हणून मानलं जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेची न्यायालयात कायदेशीर मांडणी विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी केली.

२ पंच, लपवलेल्या गोष्टी अन् स्मार्ट तपास

पारंपरिक तपासासोबत पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात तंत्रज्ञानाचा मार्ग सुद्धा निवडला. तपासाच्या पहिल्या टप्प्यात सीन रीक्रिएशन करण्यासाठी आरोपीला घटनास्थळी नेणे अनिवार्य होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठला ही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि गोपनीय पद्धतीने आरोपीला मध्यरात्री तेथे नेले. तपास पुढे जात असताना आरोपीला पुन्हा नसरापूरला नेण्याची गरज निर्माण झाली याचं कारण अटकेत असलेल्या आरोपी भीमराव कांबळे ने गुन्ह्याशी संबंधित काही वस्तू नसरापूर येथील एका मंदिरात लपवून ठेवल्याची माहिती दिली. मात्र, पुन्हा एकदा त्याला नसरापूरमध्ये नेणं संभाव्य धोक्याचं ठरू शकतं हे पोलिसांच्या लक्षात आलं. नवीन रणनीती तयार करत विशेष तपास पथकाने गावातील परिसरात २ पंच यांना पाठविले आणि आरोपीला व्हिडिओ कॉलद्वारे तिथून जोडले गेले. व्हिडिओ कॉलवरून आरोपीने वस्तू लपवलेली जागा दाखवून दिल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत त्या ठिकाणाहून संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या.

नसरापूर चा हा तपास ठरू शकतो इतर प्रकरणांसाठी दिशादर्शक

व्हर्च्युअल तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीच्या निवेदनावर आधारित पंचनामा न्यायालयात कायदेशीररीत्या सिद्ध झाल्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी दिली. तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पुरावे सुरक्षित ठेवण्याचा आणि कायदा-सुव्यवस्थेची जोखीम टाळण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयोग ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.

व्हर्च्युअल पंचनाम्यात "गाठीशेवीचे" उकलले गूढ

आरोपी भीमराव कांबळे ने चिमुरड्या मुलीला गाठीशेव देऊन गायीचे वासरू दाखवतो असे सांगून गावात असणाऱ्या गोठ्यात नेले. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून पोलिसांनी गाठीशेव चे काही तुकडे जप्त केले होते. तसेच घटना घडल्यावर अवघ्या काही तासांत अटक केल्यामुळे आरोपीच्या अंगझडतीतही गाठीशेव मिळून आली होती.

"व्हर्च्युअल पंचनाम्या" त मंदिरातून आरोपीचे साहित्य मिळाले. त्यातही गाठीशेव होती. ती गाठीशेव कुठल्या दुकानातून खरेदी केली याचा तपास एका स्वीटहोममध्ये केला गेला. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीने घटनेच्या दिवशी सकाळीच गाठीशेव खरेदी केल्याचे समोर आले. आरोपीचे साहित्य, त्याची अंगझडती आणि घटनास्थळावरून सापडलेली गाठीशेव एकच असल्याचे सिद्ध करून पोलिसांनी न्यायालयात एक ठोस पुरावा सादर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुकाराम मुंडे यांची धडक मोहीम! आता उल्हासनगरातही FDA ची कारवाई

PM Suraksha Bima Yojana : मोदी सरकारची खास योजना; फक्त २० रुपयांत मिळतो २ लाख रुपयांचा विम्याचा लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

वर्किंग वूमनसाठी बेस्ट इयररिंग्स; वेस्टर्न टू एथनिक दोन्ही कपड्यांवर दिसतील भारी

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीच्या डोहाळ्यांसाठी अर्जुनची धावपळ; पण एका चुकीमुळे बाळावर ओढावणार मोठं संकट?

Bulldozer Action: थेट खासदाराच्या कार्यालयावरच बुलडोझर कारवाई; पाच मजली ऑफिस केलं जमीनदोस्त, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT