Nashik- Akkalkot Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

Nashik- Akkalkot Expressway: नाशिक-अक्कलकोट फक्त ४ तासांत, सहा लेनचा सुपरहायवे, वाचा कसा असेल हा मार्ग

Nashik-Akkalkot in Just 4 Hours New Expressway: सुरत ते चेन्नई असा देशातील दुसरा सर्वात लांब एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. हा महामार्ग नाशिकमधून जाणार आहे. पुढे तो अक्कलकोटला जोडला जाणार आहे.

Siddhi Hande

सूरत चेन्नई एक्सप्रेसवे ६ राज्यांना जोडणार

नाशिकवरुन थेट अक्कलकोटला जाता येणार

फक्त ४ तासात नाशिक ते सोलापूर प्रवास

देशातील सहा राज्यांना जोडून एक नवीन एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे (Surat Chennai Expressway) उभारण्यात येणार आहे. या कॉरिडोरचा नाशिक-चेन्नई दृतगती मार्ग हा खूप महत्वाचा आहे. सुरतवरुन हा मार्ग चेन्नईला जाणार आहे. हा मार्ग नाशिकमधून जात आहे.नाशिकमध्ये सहा पदरी एक्सप्रेसवे उभारला जाणार आहे.यामुळे तीन धार्मिक स्थळे जोडली जाणार आहे. नाशिकवरुन तुम्हाला थेट अक्कलकोटला जाता येणार आहे.

दोन राज्यातील बंदरांना जोडणार

हा दृतगती मार्ग नाशिकमधून जाणार आहे. त्यानंतर पुढे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी जोडला जाणार आहे. यामुळे नाशिककरांना वाढवण बंदर आणि चेन्नईतील बंदर या दोन्ही सागरी मार्गांना जोडणारा रस्ता मिळणार आहे. वाढवण ते चेन्नई ही दोन महत्त्वाची बंदरे या एक्सप्रेसवेमुळे जोडली जाणार आहे.

नाशिक ते अक्कलकोट फक्त ४ तासात (Nashik Akkalkot in Just 4 Hours)

हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिला टप्पा हा अक्कलकोटपर्यंत असणार आहे तर उरलेला भाग दुसऱ्या टप्प्यात असणार आहे. अक्कलकोटपर्यंतचा हा मार्ग ३७४ किमी लांबीचा असणार आहे. सध्या नाशिक ते अक्कलकोट अंतर ५२४ किमी लांब आहे. या मार्गासाठी ९ तासाचा वेळ लागतो. नवीन मार्गामुळे हे अंतर १५० किमीने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवास ५ तासाने कमी होणार आहे. फक्त ४ तासांमध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे.

सहा राज्यांना जोडणारा महामार्ग (Surat Chennai Expressway Join 6 States)

सुरत-चेन्नई महामार्ग सहा राज्यांना जोडणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून हा महामार्ग जाणार आहे. हा देशातील दुसरा सर्वात लांब दृतगती मार्ग ठरणार आहे. नाशिकवरुन चेन्नईला जाणारा हा मार्ग आंध्र प्रदेशातून जाणार आहे. त्यामुळे तिरुपतीला थेट जाता येणार आहे. या प्रवासाला २२ ते २३ तासाचा वेळ लागायचा तो प्रवास फक्त १२ तासात पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लोकल प्रवास होणार गर्दी मुक्त, आता १८ डब्यांची उपनगरीय रेल्वे धावणार

Maharashtra Live News Update: १० दिवसांत भाजपला सोडचिठ्ठी, माजी आमदार नितीन भोसले यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश

BMC Election : आयोगाचा भाजपला जोरदार धक्का, ऐन निवडणुकीत परवानगी नाकारली

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹३००० ऐवजी ₹१५०० आले, आता डिसेंबरचा हप्ता का रखडला? महत्त्वाची माहिती समोर

Tilgul Poli Recipe : मकर संक्रांतीला फक्त १० मिनिटांत बनवा मऊसूत 'तीळ गुळाची पोळी', वाचा पारंपरिक रेसिपी

SCROLL FOR NEXT