अभिजित देशमुख, साम टीव्ही
Kalyan Crime News : राज्यात एकीकडे महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत असताना दुसरीकडे कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका ३२ वर्षीय महिलेने नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचं वारंवार लैंगिक शोषण केलं आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिला अटक देखील केली आहे. (Latest Marathi News)
किर्ती (वय ३२ राहणार, नाशिक) असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिकणारा अल्पवयीन मुलगा कल्याणमध्ये राहतो. २०१९ मध्ये त्याची नाशिक येथील कीर्ती नामक महिलेशी त्याची ओळख झाली. किर्ती ही महिला पीडीत मुलाच्या कुटुंबीयांच्या ओळखीची होती.
पीडित मुलाचे नाशिक येथे आपल्या आत्याकडे जाणे येणे असल्याने त्याची किर्तीशी ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत या किर्ती हिने अल्पवयीन मुलासोबत ओळख वाढवली. त्याला दारूचे व मोबाईलवर असलेली अश्लिल फिल्म बघण्याचे व्यसन लावले.
एकेदिवशी किर्तीने मुलाला वेगवेगळे आमिष दाखवून नाशिकला बोलावलं. तिथे त्याच्यासोबत शारीरिक संबंध (Relationship) प्रस्थापित केले. त्यानंतर त्याला पुन्हा ठाण्याला आपल्या घरी पाठवून दिलं. त्यानंतर अनेकदा या महिलेने ठाणे शहरात येऊन अल्पवयीन मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले.
इतकंच नाही तर त्याला हॉटेलात नेऊन स्वत: आणि मुलाला देखील मद्यपान करायला लावून जबरदस्तीने त्याच्यावर अत्याचार (Crime) केला. तिने आपले आणि मुलाचे नग्न व्हिडीओ देखील बनवले. दरम्यान, मुलगा दररोज कुणासोबत तरी फोनवर बोलतो. त्याचे अभ्यासात मन लागत नसल्याने आईला संशय आला.
एकेदिवशी आईने त्याचा मोबाईल तपासला असता, एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ आईला दिसून आले. या संपूर्ण प्रकारानंतर मुलाच्या आईला धक्का बसला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने याबाबत मुलाकडे विचारणा केली असता, हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
मुलाच्या कबुलीनंतर आईने त्याला घेऊन तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि सदरील महिलेविरोधात तक्रार दिली. अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी सदरील महिलेवर बाल लैंगिक शोषण कायद्यान्वे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.