Navi Mumbai Crime Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतून 11 नायजेरियन व्यक्तींना अटक; 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

Narcotics Worth Rs 16 Crore Seized : कारवाईत 11 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच नायजेरियन व्यक्तींकडून तब्बल 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

Ruchika Jadhav

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई पोलिसांनी शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर धडक कारवाई केलीये. या कारवाईत 11 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच नायजेरियन व्यक्तींकडून तब्बल 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

एनडीपीएस कायद्या अंतर्गत या 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबईतील कोपरीगाव येथे हे नायजेरियन नागरिक राहत होते. येथे राहून ते ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला.

यावेळी पोलिसांना तब्बल 16 कोटी रुपयांचे कोकेन आणि एमडी ड्रग्स मिळाले आहेत. अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांकडे अमली पदार्थांचा साठा कुठून आला? हा साठा ते कुणाला विकत होते? त्यांची पूर्ण साखळी कशी आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात 17 नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

गेल्या महिन्यात पुण्यातून देखील ड्रग्स विक्री करणाऱ्या 17 नायजेरियन नागरिकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यात 14 पुरुषांसह 3 महिलांचा समावेश होता. पुण्यातील कोंढवा येवलेवाडी मांजरी उंड्री आणि पिसोळी परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या कारवाईमध्ये देखील आरोपींकडून मोठ्याप्रमाणात ड्रग्स साठा पोलिसांनी जप्त केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भुसावळ तालुक्यातील हातनुर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील शिंदेंना कोर्टात चक्कर, रूग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन, पुण्यात अंत्यसंस्कार

Causes of high blood sugar: फक्त साखर खाल्यानेच ब्लड शुगर वाढत नाही, तज्ज्ञांनी दिली सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

India Tourism : चेरापुंजी नाही तर 'या' ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस

Ladki Bahin Yojana: मराठवाड्यातील सव्वा लाख लाडक्या बहिणींना धक्का, यापुढे खात्यात येणार नाहीत पैसे, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT