narcotics control bureau seals sheds in junnar and shirur saam tv
मुंबई/पुणे

NCB Raids In Pune : 'नार्कोटिक्स' चे पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी छापे, मोठा अंमली औषधीसाठा जप्त

या कारवाईची एनसीबीने अत्यंत गोपनीयता बाळगली हाेती.

रोहिदास गाडगे

Pune News : पुणे जिल्हातील शिरूर व जुन्नर येथे मुंबई नार्कोटिक्स विभागाचे छापे टाकत मोठा अंमली औषध साहित्य जप्त केला आहे. मिडगुलवाडी येथे तब्बल 174 किलो तर नारायणगाव येथे सुमारे 26 किलो अल्प्राझोलम (alprazolam) जप्त करण्यात आले आहे अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या कारवाईची एनसीबीने अत्यंत गोपनीयता बाळगली हाेती. (Maharashtra News)

ही कारवाई मुंबई येथील नार्कोटिक्स विभागाने केल्याचे समजते. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी व जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे मोठी कारवाई झाल्याची चर्चा दाेन्ही गावात पसरली.

या पथकाने अंमली पदार्थ सापडल्यानंतर या शेडला सील ठाेकले. शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी व जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव येथे पत्र्याचे शेड मध्ये हे सुरु होते. यामध्ये ड्रग्स साहित्य तयार करण्यात येत होते. हे शेड भाड्याने घेतल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

दरम्यान, मुंबई नार्कोटिक्सच्या पथकाने शिरूर व जुन्नर तालुक्यात कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. सुत्रांच्या माहितीनुसार या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अल्प्राझोलम आणि इतर कच्चा माल सापडला आहे.

अल्प्राझोलम हे मानसिक विकारांसाठी वापरले जाते. हे गुंगीकारक असल्याचे तज्ज्ञांकडून समजते. अल्प्राझोलम मुळे विशेषत: वयस्क लोकांमध्ये, स्मृति संबंधीत समस्या, पेंग, संभ्रम निर्माण होऊ शकतो, शरीराच्या हालचालींवरील नियंत्रण यामुळे सुटण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT