BJP vs Shivsena : फुगवून फुटतात, त्याला संजय राऊत म्हणतात - नारायण राणे SaamTV
मुंबई/पुणे

BJP vs Shivsena : फुगवून फुटतात, त्याला संजय राऊत म्हणतात - नारायण राणे

'शिवसेना UPA त सहभागी झाली तर काय फरक पडेल? 303 खासदार आहेत भाजपचे, UPA त जाऊन काय होणार?'

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : शिवसेना UPA मध्ये जाणार का? याबाबतच्या चर्चांना सध्या उधान आलं आहे. याच चर्चांच्या पार्श्वभूमीवरती आज केंद्रिय मंत्री नारायण राणेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शिवसेना UPA त सहभागी झाली तर काय फरक पडेल? 303 खासदार आहेत भाजपचे, UPA त जाऊन काय होणार? हिंदुत्वाशी गद्दारी करुन सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून टाकलं, बेईमानी केली, ते अजून नवीन काय करताहेत? संजय राऊत काहीही बोलतात देशावर सत्ता येईल का? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला. शिवाय महापालिकेत 10 नगरसेवक आहेत. सत्ता येणार आहे का? फुगवून फुटतात, त्याला संजय राऊत (Sanjay Raut) म्हणतात अशी खोचक टीका राणेंनी राऊतांवरती केली. (Narayan Rane criticizes Sanjay Raut)

हे देखील पहा -

टायटॅनिकमध्ये कोण बसणार ?

दरम्यान भाजपमधील (BJP) काही नगरसेवक नाराज असल्याच्या देखील चर्चा आहेत यावरती प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी महाविकास आघाडीवरती राणेंनी चांगलीच टीका केली ते म्हणाले, भाजपमधून कोणीही जाणार नाही . टायटॅनिकमध्ये कोण बसणार? आमची सेफ बोट, इथून निघते थेट दिल्लीला जाते. तीघांची मिळून टायटॅनिक बोट असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

दरम्यान अधिवेशन कमी कालावधीत घेण्यासाठी ओमिक्रोनचे (Omicron) आकडे फुगवले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. आतापासूनच निर्बंध घालू नयेत, लोकांची आर्थिक परिस्थिती दुबळी झाली आहे असही ते म्हणाले. तसेच आपण मुख्यमंत्र्यांच्या तब्बेतीची चौकशी रोज करतो पण ते फोन घेत नाहीत. शिवसेनेचे सगळेच संपर्कात त्यांच्याकडे चौकशी करतो. संजय राऊत दिल्लीत भेटतात, त्यांनाही विचारतो तुमचे साहेब कसे आहेत. राऊत लॉबीत चांगलं बोलतात असंही नारयण राणेंनी (Narayan Rane) सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘शिवसेना कोणाची?’ सुनावणी सुरू असतानाच शिंदेसेनेला मोठं बळ; बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 3 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

SCROLL FOR NEXT