संतोष शाळिग्राम -
नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपची साथ सोडल्यावर शिवसेनेने काँग्रेसचा हात धरत राष्ट्रीय राजकरणात स्थान मिळविण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीमधे सहभागी होण्याच्या वाटेवर चालू लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहेत. (Shiv Sena's attempt to join UPM? Sanjay Raut to visit Gandhi family)
हे देखील पहा -
पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत पुढील वर्षी होत आहे. त्याचे पडघम आताच वाजू लागले आहेत. त्यामुळेच शिवसेना आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. यूपीएमधे सामील होण्यासाठी शिवसेने प्रयत्न सुरू केले आहेत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी (Rahul Gandhi and Priyanka Gandhi) यांची भेट घेऊन संजय राऊत (Sanjay Raut) यूपीएमध्ये स्थान मिळविण्याचा मार्ग सुकर करू पाहात आहेत. ते उद्या राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यात सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
शिवसेना (Shivsena) महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर सत्तेत आहेच. त्याशिवाय संजय राऊत यांचीही राहुल गांधी यांच्याशी जवळीक वाढली आहे. तसंच कडव्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही शिवसेनेची सावध भूमिका आहे. काँग्रेसला (Congress) डाचणारी भगव्या हिंदुत्वची भाषाही शिवसेनेने सोडलेली दिसते आहे. बाबरी मशिद पतनावरही आता भूतकाळ विसरायला हवा, अशी भूमिका शिवसेना नेते मांडत आहेत. त्यामुळे काँग्रेसला अडचण ठरेल, अशी कोणतीच भूमिका शिवसेना घेत नाही. त्यामुळे यूपीएमध्ये (UPA) सामील होण्यास काँग्रेसचा विरोध असण्याची शक्यता नाही.
काँग्रेसलाही हिंदू मतांचा ताकद लक्षात आल्याने राहुल गांधी हे मंदिरात जाऊन काँग्रेस पक्ष हा हिंदू विरोधी नसल्याचे दाखवत आहे. त्यात कडव्या हिंदुत्वापासून दुरावलेली शिवसेना बरोबर आली तर काँग्रेसलाही ते हवेच आहे. महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार कुटुंबाचे सौहार्दाचे संबंध सर्वश्रृत आहे. त्यामुळे शिवसेनेला यूपीएमधे सामील करून घेण्यास राष्ट्रवादीचा विरोध असणार नाही. त्यामुळे शिवसेनेचा यूपीएतील प्रवेश सहज मानला जात आहे.
यूपीएतील सहभागामुळे शिवसेनेला एक राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळविण्याचा मार्ग सुकर होऊ शकेल. संजय राऊत यांनी यापूर्वीच आमचा पक्ष आता राष्ट्रीय स्तरावर येईल, असे सूतोवाच केले होते. त्यांच्या या स्वप्नाला आता प्रत्यक्ष आकार येत असून, शिवसेनेचा यूपीएमधील समावेश ही त्याची निष्पत्ती असेल. येत्या दोन दिवसांत राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर त्याविषयी चित्र स्पष्ट होईल.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.