Narayan Rane vs Uddhav Thackeray Maharashtra Political News Saam TV
मुंबई/पुणे

Narayan Rane News : उद्धव ठाकरेंना अटक होणार? नारायण राणे काय म्हणाले, वाचा...

Narayan Rane vs Uddhav Thackeray : ...तर उद्धव ठाकरेंचं योग्य जागी (तुरुंगात) जाणं होईल, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray vs Narayan Rane : "उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांवर जास्त बोलू नये तसेच टीका टिप्पणी करून नये, त्यांनी जर पाठ फिरवली आणि बोट दाखवलं, तर उद्धव ठाकरेंचं योग्य जागी (तुरुंगात) जाणं होईल", असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. नारायण राणेंच्या या विधानाने उद्धव ठाकरे यांना खरचं अटक होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Breaking Marathi News)

काय म्हणाले नारायण राणे?

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. फडतूस या शब्दावरून पेटलेल्या राजकारणावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, "इतकं सगळं करून ही तुम्ही (उद्धव ठाकरे) बाहेर आहात. याचं एकच कारण आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव". (Latest Marathi News)

"बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच तुम्ही बाहेर राहिला आहात. नाही तर हे शक्य झालं नसतं. देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करण्याची तुमची लायकी तरी आहे का? लक्षात ठेवा भाजपचा कोणताही नेता आणि कार्यकर्त्यांसाठी अशी भाषा पुन्हा वापरली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील."  (Maharashtra Political News)

वाजे कोण ठाकरेंचे जावई आहेत का?

"सुशांतसिंग राजपूतला का मारले? दिशा सालियनची केस का ओपन झाली नाही? सचिन वाजे कोण ठाकरेंचे जावई आहेत का? नोकरीवर नसताना वाजेला पद दिले. अशा प्रकारे गुन्हेगारांना मदत करणारे ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रीमंडळातील तीन मंत्री तुरुंगात गेले. गृहमंत्र्यांनाही जेलमध्ये जावे लागले. आता ते कोणावर बोलतात?", अशी घणाघाती टीकाही नारायण राणेंनी (Narayan Rane) ठाकरेंवर केली.

"उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात 'खोके' घेतले"

महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. कोरोना काळात त्यांनी अनेक खोके घेतल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. ते म्हणाले, "अडीच वर्षे तुम्ही जे काही खोके कमावले, त्यातील काही मदत शिवसैनिकांना केली नाही. कोरोना काळातील जे जे काही औषधांची टेंडर निघाले त्यातील १५ टक्के कमिशन अदित्य ठाकरे यांनी घेतले. त्यानंतरच सही दिली".

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

Nanded News : नांदेडमध्ये मतमोजणीदरम्यान दोन गटात तूफान राडा

SCROLL FOR NEXT