नांदेड औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग; एक मृतदेह आढळला  Saam TV
मुंबई/पुणे

नांदेड औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग; एक मृतदेह आढळला

अग्निशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: किरकटवाडी सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भाऊ इंडस्ट्रीज इस्टेट या कंपनीला भीषण आग लागली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाची (Fire brigade of Pune Metropolitan Region Development Authority) आठ वाहने घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असून अग्निशमन दलाच्या जवानांनी एक मृतदेह बाहेर काढला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, अग्निशमन केंद्रप्रमुख सुजित पाटील यांच्यासह 17 जवानज्ञव पुणे महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान सदर कंपनी केक वरील शोभेची दारू बनविण्याची असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड जात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली असून हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी गर्दी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT