केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी करावी- नाना पटोले Saam Tv
मुंबई/पुणे

केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी करावी- नाना पटोले

लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जातोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : लखीमपूर घटनेचा निषेध करत आज महाविकास आघाडी कडून 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. आज राज्यातील विविध जिल्ह्यांमधून बंद ला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. या बंद च्या निषेधार्थ काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी देखील लखीमपूर घटनेवर रोष व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत बोलत होते. ते यावेळी म्हणाले या घटनेने लोकशाहीचा गळा घोटला जातोय. तसेच केंद्रीय मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

हे देखील पहा-

या घटनेत केंद्रीय मंत्र्याचया मुलाने आपल्या गाडीखाली चिरडले. आमच्या नेत्या प्रियांका गांधी भेटायला गेल्या तर त्यांना किडनॅप करण्यात आलं. 36 तास नजरबंद केलं. ही घटना म्हणजे लोकशाही गळा घोटला आहे. आशिष मिश्रा अटक केली पण न्यायालयीन कोठडी दिली. या हिंसाचारात 302 अंतर्वत कारवाई व्हावी. तसेच मंत्र्यांची राजीनामा व्हावा आणि केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी करावी ही मागणी नाना पाटोले यांनी केली आहे.

आज बंद मध्ये व्यापारी सहभागी झाले आहेत. मोदी सरकार केंद्रात आल्यावर जीएसटी माध्यमातून चिरडले जात आहे. आज अत्याचारी भाजप ला हा धडा आहे. आम्ही 15 हजार कोटी नुकसानीसाठी केंद्राकडे मागितले आहेत. तो आमचा अधिकार आहे. त्याऐवजी त्यांनी फक्त दीड हजार कोटी देण्याची घोषणा केली आहे. केंद्र काही उपकार करत नाही पण, अजून मिळाले नाही.

कोळशाअभावी अनेक विद्युत पुरवठा केंद्र बंद झाले आहेत. महाराष्ट्र अंधारात जाण्यासाठी केंद्र पुरेपुर प्रयत्न करत आहे. दिल्ली राजस्थान महाराष्ट्र याच राज्यात परिस्थिती निर्माण झाली. मुद्दाम केंद्र सरकार करत आहे. हे दोन्ही भाजपविरोधी राज्य आहे, त्यामुळेच अशा घटना घडतात. कुठेही जबरदस्ती करू नका असे कार्यकर्त्यांना सांगितलं असलयाचे नाना पटोले म्हणाले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Puran Poli Recipe : मकर संक्रांत स्पेशल इन्स्टंट पुरणपोळी; फॉलो करा 'ही' रेसिपी, घाईगडबडीतही पदार्थ बनेल चविष्ट

Maharashtra Live News Update : विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरात रोड शो

Railway New Service: दिलासादायक! रेल्वे प्रवासी ताण तणावातून मुक्त होणार, CSMT स्टेशनवर नवी सुविधा सुरू

भाजप उमेदवाराच्या मुलाची अजित पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

एकेकाळची ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री शिवसेनेची मशाल घेऊन मैदानात, ठाकरेंसाठी मुंबईत दारोदारी करतेय प्रचार

SCROLL FOR NEXT