Mumbai Surat Rapid Railway News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Surat : प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई ते सुरत धावणार रॅपिड रेल्वे; जाणून घ्या सविस्तर माहिती

Mumbai Surat Rapid Railway News : मुंबई ते सुरत दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन प्लॅटफॉर्म आणि आधुनिक गाड्यांमुळे प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई-सुरत उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता

  • सुरत स्टेशनवर नवीन प्लॅटफॉर्म तयार होत आहेत

  • मेमू आणि नमो भारत ट्रेनचा विचार

  • प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवास

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता सुरतला जाण होणार सोपं. कारण आता मुंबई आणि सुरत दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होऊ शकेल.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत रेल्वे स्थानकावर दोन नवीन प्लॅटफॉर्म आणि एक उपनगरीय प्लॅटफॉर्म बांधणार आहे. हे प्लॅटफॉर्म विशेषतः उपनगरीय गाड्यांसाठी तयार केले जात आहेत, ज्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो. सध्या दोन मार्गांवर काम सुरू आहे. पहिला मार्ग मुंबई-सुरत आणि दुसरा सुरत-अहमदाबाद आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर उपनगरीय सेवा चालवली जाईल. मुंबई आणि सुरत दरम्यानचे अंतर लक्षात घेता, मेमू ट्रेन्स हा एक चांगला पर्याय मानला जातो, कारण त्या लोकल ट्रेन्सपेक्षा अधिक आरामदायी आणि सोयीस्कर आहेत. रेल्वेकडून या मार्गावर नमो भारत ट्रेन्स चालवण्याची शक्यता आहे. उपनगरीय सेवेमध्ये पारंपरिक ईएमयू लोकल ट्रेन्स, आधुनिक मेनलाइन ईएमयू ट्रेन्स आणि नमो भारत ट्रेन्स यांचा समावेश आहे.

सध्या पश्चिम रेल्वेवर विरार-सुरत मेमू ट्रेन चालवली जाते. ज्याला ५ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो आणि ती ३० स्थानकांवर थांबते. सध्या या मार्गावर फक्त दोन फेऱ्या आहेत, परंतु नवीन प्लॅटफॉर्म आणि आधुनिक गाड्या सुरु झाल्यास सेवा वाढण्याची शक्यता आहे. सुरत स्थानकाचाही पुनर्विकास सुरू असून, ४६ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई आणि सुरत दरम्यान अशी उपनगरीय सेवा सुरू झाल्यास, हजारो दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळेल. ही सेवा विशेषतः कार्यालये आणि व्यवसायांसाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्याचीही अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT