BDD Chawl News Saam TV
मुंबई/पुणे

बिडीडी चाळींचे नामकरण; बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधीसह शरद पवारांचंही नाव

मुंबईतील बीडीडी चाळींची नावं आता बदलण्यात आली असून या चाळींच्या नामकरणाचा आदेश राज्य सरकारच्या गृहनिर्मान विभागाकडून काढण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींची (BDD Chawl) नावं आता बदलण्यात आली असून या चाळींच्या नामकरणाचा आदेश राज्य सरकारच्या गृहनिर्मान विभागाकडून काढण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता वरळीतील बीडीडी चाळ ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर या नावाने ओळखली जाणार आहे. तसचं नायगावची चाळ शरद पवार नगर तर ना. म. जोशी चाळ ही आता राजीव गांधी नगर या नावाने ओळखली जाणार आहे.

वरळी (worli) येथील या चाळी जवळपास ९६ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या असल्याने, त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळाच्या मान्यतेने घेतलेला होता. तसंच या चाळींचे नामकरण करण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे या चाळींच्या नामकरनाचा निर्णय घेतला आहे. आज त्याबाबतचा शासन निर्णय आज (शुक्रवारी) जारी करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

या चाळींचा पुनर्विकास होत असल्याने चाळींच्या नामकरण करण्याची घोषणा गृहनिर्मान मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सन २०२२ च्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती त्यानुसार आता या चाळींच नामकरण केल्याचा शासन निर्णय जारी झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT