Nalasopara Crime News  AI Image
मुंबई/पुणे

Nalasopara : नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीची प्रसूती, दुसऱ्या दिवशी ४० हजारांना विकले बाळ

Nalasopara Crime News : नालासोपाऱ्यात नवजात बाळाची ४० हजार रुपयांना विक्री केल्याचा आरोप समोर आला आहे. तुळींज पोलिसांनी अनेकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एका २२ वर्षीय तरुणाला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार

  • १७ वर्षीय मुलीची अवैध प्रसूती

  • नवजात बाळाची ४० हजारांना विक्री

  • पोलीस तपास सुरु

नालासोपारा शहरात नवजात बाळाच्या कथित विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात या नवजात बाळाची ४० हजार रुपयांना विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, तुळींज पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरात असलेल्या सूर्या रुग्णालयात रविवारी ही घटना घडली. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची या रुग्णालयात प्रसूती झाली होती. त्यानंतर अवघ्या एका दिवसात नवजात बाळाची ४० हजार रुपयांना विक्री केल्याचा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बेकायदेशीररीत्या प्रसूती करून बाळाची विक्री करण्यात आल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सोमवारी अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला २२ वर्षीय तरुण, मुलीची आई, एक महिला शेजारीण, प्रसूती करणारे डॉक्टर तसेच बाळ खरेदी केल्याचा आरोप असलेल्या दाम्पत्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील २२ वर्षीय तरुणाला अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचाराच्या प्रकरणात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे. नवजात बाळाची विक्री नेमकी कोणाच्या पुढाकाराने करण्यात आली, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या व्यवहारामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच संबंधित रुग्णालयातील प्रसूती आणि बाळाच्या संदर्भातील बाबींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bladder cancer in dogs: 6 महिन्यांपासून लघवीतून रक्तस्राव, तपासणीत कॅन्सरचं निदान; डॉक्टरांकडून श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: कल्याणच्या उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवर सुपरवायझरला मारहाण; भाजप पदाधिकारी विजय जोशी यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

Election: आमदार-खासदारांना मोठा धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नो एन्ट्री

PF Withdrawal : PF खात्यात 1 लाख रुपये जमा असतील तर किती पैसे काढता येतात? जाणून घ्या नवे नियम

'कोठडीत तरुणांना इतकं मारलं की एका कानाने ऐकू येईनासं झालं! राहुल गांधींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT