Nalasopara News: राज्यभरात आषाढी एकादशीचा आणि बकरी ईद सणाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच नालासोपाऱ्यात एक दुर्देवी घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यातील तूलिंज स्मशानभूमी परिसरात पोहायला गेलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News IN Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, नालासोपाऱ्यात (Nala sopara) पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यातील तूलिंज स्मशानभूमी परिसरात ही दुर्देवी घटना घडली. दनान शेख (वय,२२) आणि अमान खान (वय, १८) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. (Crime News)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. तसेच पोलिसांनी दोघांचेही मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू...
बोरिवलीच्या (Borivali) गणपत पाटीलनगर येथे घराचा पोटमाळा कोसळला. ज्यामध्ये दीड महिन्याच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.