Nahur Airoli Flyover Saam Tv
मुंबई/पुणे

Nahur Airoli Flyover: नाहूर ते ऐरोली फक्त २५ मिनिटांत, नव्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीची कटकट संपणार

Nahur Airoli Flyover: गोरेगाव मुंलुंड लिंक रोडचे काम अंतिम टप्प्यात आहे. यानंतर नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलासाठीही निविदा काढण्यात आली आहे.

Siddhi Hande

नाहूर ते ऐरोली उड्डाणपुल बांधणार

चार इंटरचेंज जोडले जाणार

ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई जोडली जाणार

मुंबईवरुन आता नवी मुंबई जोडली जाणार आहे. मुंबईत गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच काम सुरु आहे. अशातच आता त्यातील पुढचा टप्पा नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलासाठी निविदा काढण्यात आली आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम पूर्ण होईल. यानंतर चौथ्या टप्प्यासाठी नाहूर ते ऐरोली उड्डाणपुल बांधला जाणार आहे. नाहूर ते ऐरोली उड्डाणपूल १.३३ किमी लांब असणार आहे. यामध्ये ठाणे आणि मुंबईला जोडणारे इंचरचेंज असणार आहे.

नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलासाठी १२९३ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. हा नवीन उड्डाणपूल ऐरोली उड्डाणपुलावर बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपुलामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. यामुळे नाहूर, ऐरोली, ठाणे आणि साउथ मुंबई या चारही दिशांना कनेक्टिव्हिटी मिळेल. या चार दिशांना जोडणाऱ्या इंटरचेंजला सिग्नल नसणार आहे.

ऐरोली उड्डाणपुलावर नवीन ब्रिज (Nahur-Airoli New Bridge)

ऐरोली उड्डाणपुलावरील केबल स्टेज पूल बांधण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली अस १.३३ किमी लांबी उड्डाणपुलाचा समावेश आहे.

यामध्ये दुसऱ्या टप्प्यात चार इंटरचेंज असणार आहे. ठाणे-नाहूर, ऐरोली-ठाणे, मुंबई ऐरोली आणि ऐरोली- मुंबई असे इंटरचेंज असणा आहे. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. १२.२ किमी लांबीचा गोरेगाव मुलुंड लिंक रोड वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि मुलुंड येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडला जाणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरुन २५ मिनिटांवर येणार आहे. म्हणजेच ५० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

हा प्रकल्प १४००० कोटींचा आहे. यामुळे मुंबईत पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामध्ये दिंडोशीजवळ १.२ किमी लांबीचा उड्डाणपुल असणार आहे. याचं काम २०२६ पर्यंत पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

पुन्हा मोठा राजकीय भूकंप! एकवेळ भाजपसोबत जाऊ, पण शिंदेंसोबत नाही; राऊतांनी बॉम्ब फोडला

Marathi Movie: आग्रा स्वारीचे शौर्य पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा ट्रेलर थरारक ट्रेलर प्रदर्शित

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Haldi Kumkum Rangoli Design: हळदी- कुंकूवासाठी काढा या 5 सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या

SCROLL FOR NEXT