vande bharat express saam tv
मुंबई/पुणे

Vande Bharat : नागपूरहून पुणे-मुंबईला वंदे भारत कधी धावणार? सहा महिन्यानंतरही प्रस्ताव धूळखात

Nagpur-Pune-Mumbai Vande Bharat: नागपूरहून मुंबई-पुण्याला अनेकजण अप डाउन करतात. त्यामुळे लवकरच नागपूर-पुणे-मुंबई वंदे भारत ट्रेन सुरु करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

Namdeo Kumbhar

मुंबई अन् पुण्यात नोकरी अन् शिक्षणाच्या निमित्ताने विदर्भातून अनेकजण प्रवास करत असतात. दररोज ये जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, पण रेल्वेंची संख्या निवडच आहे. एक्स्प्रेस मोजक्याच असल्यामुळे विदर्भात ये जा करताना कसरत करावा लागते. खासगी वाहनाने अथवा एसटी बसने प्रवास करताना वेळ अन् पैसे दोन्ही जातो. त्यामुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याच्या हालचाली पुन्हा शांत जाल्याचे दिसतेय.

मुंबई आणि पुण्याला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, अशी विदर्भातील लोकांची इच्छा आहे. त्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाकडबन जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ग्रीन सिग्नल दिला होता. त्यामुळे विदर्भवासीयांची इच्छा पूर्ण होणार, असे वाटलं होतं. पण सध्या तरी कोणत्याच हालचाली दिसत नाहीत.

नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे या मार्गावर लवकरच वंदे भारत धावेल, अशी माहिती रेल्वेच्या नागपूर विभागाने दिली होती. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला होता. पण रेल्वे बोर्डाकडून नागपूर-मुंबई आणि नागपूर पुणे या मार्गाला अद्याप मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे विदर्भवासीयांची वंदे भारतची इच्छा अद्याप तशीच आहे. सध्या नागपूरमधून ३ वंदे भारत एक्सप्रेस धावतात. सिकंदराबाद, इंदूर आणि बिलासपूर या मार्गावर वंदे भारतचे सर्वाधिक प्रवासी आहेत.

नागपूरहून पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. दररोज शेकडो लोकं या मार्गावर ये जा करतात. पण गाड्यांची संख्या मर्यादीत आहेत. त्यामुळे नवीन गाड्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. प्रवाशांच्या संख्या पाहून रेल्वेकडून नागपूरहून पुणे आणि मुंबईसाठी दोन वंदे भारत सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण रेल्वे बोर्डाकडून याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नागपूरहून मुंबई आणि पुण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस कधी धावणार? याची प्रतिक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: खेडमधील पिकअप अपघातातील ९ मृतांची नावं आली समोर, पापळवाडी गावावर शोककळा

Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यर पास; हार्दिक पांड्या वेटिंगवर तर सूर्या दादाबाबत सस्पेन्स

Janhvi Kapoor: परम सुंदरीचा नविन फ्लॉरल साडी लूक पाहिलात का?

बनावट शाळा आयडी प्रकरणात कारवाईचा धडाका; हजारो लाडक्या शिक्षक रडारवर|VIDEO

Maharashtra Live News Update: मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी

SCROLL FOR NEXT