माय नेम इज बाँड.....मुंबई पोलिसांच्या बँडपथकानं वाजवली आगळी धून! Saam Tv
मुंबई/पुणे

माय नेम इज बाँड.....मुंबई पोलिसांच्या बँडपथकानं वाजवली आगळी धून!

मुंबई पोलीस दलातले जेम्स बॉण्ड

सूरज सावंत

मुंबई - कानून के हाथ लंबे होते है... हा संवाद अनेक चित्रपटांमध्ये आपण ऐकलाय. एखादा सस्पेन्स सिनेमा असला की त्यामध्ये हे वाक्य सर्रास असतं. आणि हे वाक्य असायलाच हवं. त्याशिवाय तपासाला मजाच येत नाही. आत्तापर्यंत आपण खाकी मधले पोलीस जवान पाहिले. पहिल्या लॉग डाऊन मध्ये हातामध्ये काठी घेऊन बेशिस्त त्यांना सरळ करताना पाहिले. एखाद्या गुन्ह्याचा छडा काही तासांमध्ये लावताना पाहिले. इतकेच काय तर मुंबई पोलिसांच्या दहशतीमुळे आणि गुंड देश सोडून फरार झाले आहेत. मात्र आत्ता जे आम्ही तुम्हाला मुंबई पोलिसांचं रूप दाखवणार आहोत ते पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

हे देखील पहा -

हे आहेत आपल्या मुंबईतले पोलिस जवान. एरवी आपण या पोलीस जवानांचा बँडपथक पाहत असतो. 26 जानेवारी असेल 15 ऑगस्ट असेल यावेळेस हे बँड पथक आपल्याला पाहायला मिळतं. देशभक्तीपर गीतं या बँड वर वाजवली जातात. अतिशय मंत्रमुग्ध करणारी धून ऐकल्यानंतर आपण कितीही तणावात असलो तर मनाला शांती मिळते. आणि एक राष्ट्रभक्तीची भावना मनामध्ये जागृत होते.

आता आपले पोलिस जवान म्हणजेच या बँड पथकातले जावन यांनी नवीन धून आपल्यासमोर सादर केली आहे. बरे ही धून तुम्ही एका इंग्रजी सिनेमांमध्ये ऐकली आहे. ही धून आहे जगप्रसिद्ध जेम्स बॉण्ड या सिनेमाची. जेव्हा जेव्हा ह धून कानावर येते तेव्हा तेव्हा एक डिटेक्टिव्ह व्यक्ती आपल्या नजरेसमोर उभाच राहतो. आपल्या पोलीस दलातील प्रत्येक जवान हा जेम्स वर्ड पेक्षा काही कमी नाही बरं. गुन्ह्याचा छडा हा एका मिनिटात लावतात.

गुन्ह्याचा छडा लावत असताना पोलीस काळातल्या जवानांनी जेम्स बॉण्ड ची थीम सादर केली आहे. एकदा नव्हे तर दहा वेळा ऐकावी इतकी अस्खलित वाजवले आपल्या जवानांनी. परदेशात ज्यांनी जेम्स बॉण्ड ची हि थीम तयार केली त्यांनी कोट्यावधी रुपये हि थीम तयार करण्यावर खर्च केले असतील. मात्र आपल्या पोलीस जवानांनी सहजच हि थीम तयार केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: केव्हा, कुठे रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना? इथे पाहा फुकटात

Maharashtra News Live Updates: बीडमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी महिला आमदाराचा शरद पवार गटात प्रवेश

CM Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंची यांची मशाल घराघरांत आग लावणारी; एकनाथ शिंदे यांचा धाराशिवातून घणाघात

Amit Shah : राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?

Today Horoscope: कामाच्या ठिकाणी होतील वाद, तर काहींचे परदेशी दौरे होतील पक्के; वाचा तुमच्या राशीत काय?

SCROLL FOR NEXT