Sunetra Pawar google
मुंबई/पुणे

Baramati Bypoll: सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरून मविआत मतभेद? बारामतीसाठी काँग्रेसनं ठोकला शड्डू

Sunetra Pawar Support Controversy: बारामती पोटनिवडणुकीवरून मविआत चांगलेच मतभेद निर्माण झालेत. बारामतीची निवडणुक बिनविरोध करून सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची तयारी असतानाच मविआतील मित्रपक्षानं बारामतीत कसा शड्डू ठोकलाय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीनं आता एक वेगळचं वळण घेतलयं...एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केलीय. दिल्ली दौऱ्यावरून परतताच सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

तर उद्धव ठाकरेंही बिनविरोध निवडणुकीबाबत सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काँग्रेस मात्र निवडणुकी लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीवरून मविआतले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

तर दुसरीकडे शरद पवार आणि जयंत पाटलांमध्ये बारामती पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासंदर्भात सिल्वर ओकवर महत्त्वपूर्ण बैठक झालीय. विशेष म्हणजे शरद पवार स्वत: काँग्रेस हाय कमांडशी बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे राज्यातली काँग्रेस निव़डणूक लढण्यावर ठाम राहणार की ठाकरे-पवारांच्या आग्रहामुळे माघार घेणार याबाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

SCROLL FOR NEXT