Mumbai News Update Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News: क्रूरतेचा कळस! बेकायदेशीर मद्यविक्री बेतली मुक्या प्राण्याच्या जिवावर, परळमध्ये पाळीव कुत्र्याची निर्घृण हत्या

Mumbai News Update: बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याच्या विरोधात लढणाऱ्या महिलेच्या पाळीव श्वानाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना परळ भागात घडली आहे.

Sandeep Gawade

Mumbai News

बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याच्या विरोधात लढणाऱ्या महिलेच्या पाळीव श्वानाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना परळ भागात घडली आहे. परळ परिसरातील मनपाच्या शाळेच्या आवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्यविक्रीला संबंधित महिलेने विरोध केला होता. याच्या रागातून मद्यविक्री करणाऱ्यांनी श्वानाची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीसांकडून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील परळ परिसरातील रहिवासी असलेल्या महिलेच्या पाळीव श्वांनाची हत्या करण्यात आली आहेत. परळ भागात असलेल्या जगन्नाथ भातणकर मार्ग मनपा शाळेच्या आवारात त्यांच्या लाडक्या दत्तक श्वान राजाचा मृतदेह आढळला. मृतदेह पाहून श्वानाला निर्घृणपणे ठार केल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर, दरेकर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्ह्याची नोंद केली.

परळ परिसरातील याच शाळेच्या आवारातून बेकायदेशीर मद्य विक्रीला साक्षी दरेकर यांनी विरोध केला होता.या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्या होत्या. परिणामी बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्याचा साक्षी दरेकरसोबत तणाव निर्माण झाला होता. सोबतचा जिवेमारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे श्वानाच्या क्रूर हत्येला मद्य विक्रेते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या महिलेने या घटनेसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मद्य विक्रीच्या रॅकेटशी संबंधित व्यक्तींकडून धमक्या आल्या होत्या, धमक्या देणाऱ्याने दरेकर याना विरोध थांबवण्याचा इशारा दिला होता. तसेच मागण्या न मान्य केल्यास वाईट होईल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती की आरोपी त्यांच्या प्रिय पाळीव श्वानाला इजा पोहोचवतील. पोलिस तक्रारीनुसार, श्वानाचे पाय बांधलेले असून त्याला काठ्या किंवा जड वस्तूने मारहाण केल्याचे दिसून आले. या गुन्ह्यात राजकीय पक्षात कार्यरत एका व्यक्तीचा या सहभाग असल्याचा दरेकर यांचा आरोप आहे. प्राणी क्रूरतेच्या या घृणास्पद कृत्याला जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी भोईवाडा पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT