Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात अवैध बांधकामावर मनपाचा हातोडा, ५ मजली इमारत जमिनदोस्त

Pune Illegal Construction: महापालिकेच्या बांधकाम विभाग झोन २ ने अनधिकृत प्लॉटिंगवर धडक कारवाई केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Municipal Encroachment Department : पुण्यात येवलेवाडीत अनाधिकृत प्लॉटिंगसह बांधकामांवर महापालिका अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. येवलेवाडी परिसरात विविध प्रकारची आरक्षणे असताना अनधिकृतपणे प्लॉटिंग आणि बांधकामे आहेत. हे लक्षात घेऊन महापालिकेच्या बांधकाम विभाग झोन २ ने अनधिकृत प्लॉटिंगवर धडक कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

येवलेवाडीतील सर्वे क्रमांक ३३ मधील ५ मजली इमारतीवर ६ हजार चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम पाडण्यात आले.यासह ३ हजार चौरस फूट क्षेत्रावरील गोडाऊन तसेच प्लॉटिंग विकण्यासाठी करण्यात आलेले रस्ते उखडून टाकण्यात आलेत.

एक जॉ-कटर, ३ जेसीबी, गॅस कटर व अतिक्रण विभागाकडील ९ बिगारी आदी सामुग्रीच्या सहाय्याने कारवाई केलीय.अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण विभागाकडील पोलीस कर्मचाऱ्यांचे पथकही यावेळी उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली महापालिकेची ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

कल्याण डोंबिवली महापालिकेने महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात असलेल्या अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाईचा धडाका सुरू केलाय.पालिकेच्या आय प्रभागातील आडीवली, ढोकली गावात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या चाळींमधील १३ रूम व ८ जोत्यावर कारवाई करत ही बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. पालिकेच्या या कारवाईमुळे चाळ माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT