Mumbai Metro 2 A & 7 A  Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Metro: PM मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A आणि 7 मार्गांचे लोकार्पण, किती असेल तिकीट दर, पाहा डिटेल्स

12600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण झाल्याने याचा मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे.

Gangappa Pujari

Mumbai: देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी मुंबईनगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या या दौऱ्यानिमित्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यावेळी मुंबईतील मेट्रो मार्ग 7 (टप्पा 2) आणि मार्ग 2 अ (टप्पा 2) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. 

12600 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण झाल्याने याचा मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे. दहिसर पूर्व आणि डीएन नगर (पिवळी लाईन) यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 2 अ ही सुमारे 18.6 किमी लांबीची आहे. तर अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व (लाल लाईन) यांना जोडणारी मेट्रो मार्गिका 7 सुमारे 16.5 किमी लांबीची आहे.

मुंबई मेट्रो लाईन 2A मध्ये 17 स्थानके आहेत, ती म्हणजे अंधेरी (पश्चिम), पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड (पश्चिम), एकसर, मंडपेश्वर, कंदरपाडा, अप्पर दहिसर आणि दहिसर (पूर्व), लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव (पश्चिम), वलणई, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम), पहाडी एकसर, बोरिवली (पश्चिम). ही मेट्रो लाईन दहिसर पूर्व येथील मेट्रो लाईन 7 ला छेदेल.

तिकीट दर किती असेल?

मुंबई मेट्रो (Mumbai Metro) रेल्वे कॉर्पोरेशनने मेट्रो 7 आणि मेट्रो 2अ या दोन्ही मार्गिकांच्या तिकीट दरांची घोषणा केली आहे. या मार्गिकांसाठी तिकीट दर 10 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत असणार आहे. ते अंतरानुसार विभागले जातील.

यामध्ये 0-3 किमीसाठी 10 रुपये तिकीट दर असेल. त्याचबरोबर 3-12 किमीसाठी 20 रुपये आकारले जातील. 12-18 किमीसाठी 30 रुपये असेल. याचप्रमाणे 18-24 किमीसाठी 40 रुपये आणि 24-30 किमीसाठी 50 रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT