Mumbai's Bandra terminus station stampede : दिवाळीमुळे गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवाळीसाठी मुंबईहून रेल्वेने गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज सकाळी वांद्रे रेल्वे स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वांद्रे स्टेशनवर फलाट क्रमांक १ वर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरी झाल्याची घटना नोंदवण्यात आली. ही दुर्देवी घटना नेमकी कशामुळे घडली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमध्ये ९ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ( Several Passengers Injured at Bandra Terminus Due to Rush)
रविवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान वांद्रे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेची माहिती वॉचमनने पोलिसांना दिली. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर वांद्रे स्टेशनवर एकच खळबळ उडाली होती. लोकांना सुरुवातीला नेमकं काय घडलं? हे समजलेच नाही. सैरभैर होऊन लोक पळत होते. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत. त्यामधील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमीवर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी पाच वाजून १० मिनिटांनी आली. त्यानंतर अचानक गर्दी वाढली अन् चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येतेय.
जखमी प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे -
1.सुखबीर अब्दुल रहमन, ४० वर्षे
2. परमेश्वर गुप्ता, वय २८ वर्षे
3. रविंद्र चौमा, वय ३० वर्षे
4. रामसेवक प्रजापती
5. संजय कांगेय, वय २७
6.दिव्यांशी यादव, वय १८
7. मोहम्मद शेख, वय २५
8. इंद्रजीत सहानी, वय १९
9. नूर मोहम्मद शेख, वय १८
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.