मुंबईकरांनो 31st आणि न्यू इयरची पार्टी प्लॅन करतायत? थांबा आधी पालिकेची नियमावली वाचा... Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांनो 31st आणि न्यू इयरची पार्टी प्लॅन करतायत? थांबा आधी पालिकेची नियमावली वाचा...

मुंबईत कारोना रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने थर्टी फर्स्टची आणि न्यू इयरच्या पार्ट्यांवर अनेक निर्बंध आणले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नवीन वर्ष उजाडायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. अनेक जण थर्टी फर्स्टची आणि न्यू इयरची पार्टी (New Year Party) प्लॅन करत आहेत. मात्र तुम्ही मुंबईत (Mumbai) असाल तर तुम्हाला पालिकेच्या या नव्या नियमांबद्दल माहीत असणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचीच पंचाईत होऊ शकते. मुंबईत कारोना (Corona) रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनच्या (omicron) पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने थर्टी फर्स्टची आणि न्यू इयरच्या पार्ट्यांवर अनेक निर्बंध आणले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना कायद्यात राहूनच थर्टी फर्स्टची (31st Party) आणि न्यू इयरची पार्टी साजरा करायची आहे. (Mumbaikars are you planning 31st and New Year party? Wait ... read the rules of the municipality first)

हे देखील पहा -

पार्टीच्या आयोजनावर बंदी

नववर्ष स्वागताच्या हेतूने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत, कोणत्याही बंदिस्त अथवा मोकळ्या किंवा खुल्या जागेत सोहळा, समारंभ, पार्टी अथवा इतर कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनावर बंदी (Ban) घालण्यात आली आहे. लग्न समारंभ तसेच कोणत्याही सामाजिक, राजकीय अथवा धार्मिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी बंदिस्त जागेत १००, खुली जागा असल्यास तर २५० किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के; यापैकी जी संख्या कमी असेल, तेवढ्याच व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. वरील दोन्ही बाबींमध्ये समाविष्ट नसलेल्या इतर कोणत्याही आयोजनाप्रसंगी, बंदिस्त व कायमस्वरूपी आसनव्यवस्था असलेल्या जागी क्षमतेच्या ५० टक्के तर कायमस्वरुपी आसन व्यवस्था नसलेल्या बंदिस्त जागी क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

५० टक्के उपस्थिती

सर्व उपहारगृहे, व्यायामशाळा, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे याठिकाणी मंजूर क्षमतेच्या ५० टक्के इतकीच उपस्थिती असावी. या सर्व आस्थापनांनी जागांची मंजूर पूर्ण क्षमता व ५० टक्के क्षमता या दोन्ही बाबी जाहीर कराव्यात. क्रीडा स्पर्धा, समारंभांच्या आयोजनाप्रसंगी प्रेक्षकांची संख्या ही आसन क्षमतेच्या २५ टक्के इतकीच असावी. सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी समूहाने एकत्र वावरण्यास मनाई करण्यात आली आहे.

कायदेशीर कारवाई

सर्व नागरिक, आयोजक, आस्थापना यांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे सक्तीने पालन करावे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन आढळल्यास 'भारतीय दंडविधान संहिता' आणि 'आपत्ती व्यवस्थापन अधिनियम' नुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करून घ्यावे असं आवाहन पालिकेने केलं आहे, तसेच सार्वजनिक ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा दिली जाईल असंही पालिकेने स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनांची सविस्तर माहिती घेऊन व त्यानुसार काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असं आवाहन पालिकेने नागरिकांना केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : निवडणुकीपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का, कल्याणच्या जिल्हाप्रमुखांसह ८ नगरसेवक भाजपमध्ये

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या, पोलिसांची नोटीस धडकली, नेमकं प्रकरण काय?

Solapur politics : एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, तानाजी सावंतांच्या भावाने साथ सोडली, आता कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

SCROLL FOR NEXT