Mumbai Saam
मुंबई/पुणे

Mumbai : रेल्वे स्टेशनच्या पायऱ्यावर पाकिस्तानी झेंडे पाहताच मुस्लिम महिला संतापली, स्वत: काढत बसली; VIDEO व्हायरल

Woman Takes Down Pakistani Flags at Vile Parle Railway Station: मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकावर एक खळबळजनक घटना घडली. स्थानकाबाहेरील पायऱ्यांवर लावलेले पाकिस्तानी झेंडे पाहून एका मुस्लिम महिलेनं गोंधळ घालत स्वत: झेंडे काढले.

Bhagyashree Kamble

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच ताणले गेले. संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच मुंबच्या विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर एक खळबळ माजवणारी घटना घडली. विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेरील पायऱ्यांवर पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले होते. एका मुस्लिम महिलेने हे झेंडे पाहून ते काढले. झेंडा काढत असताना काहींनी व्हिडिओ शूट केला. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

४ मे २०२५ रोजी विलेपार्ले रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांकडून याचा निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून परिसरातील काही रिक्षा चालकांनी विलेपार्ले रेल्वे स्थानकावरील पायऱ्यांवर पाकिस्तानचे झेंडे चिकटवले. मात्र, त्या ठिकाणी अचानक एक मु्स्लिम महिला आली. तिने पायऱ्यांवर चिकटवलेले पाकिस्तानी झेंडे पाहून गोंधळ घातला. तसेच झेंडे काढायला सुरूवात केली.

पाकिस्तानी झेंडा काढत असताना, तिने उपस्थितीतांना पोलिसांची धमकी दिली, 'मला कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला, तर मी पोलिसांत तक्रार करेन,' अशी धमकी त्या महिलेने दिली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून झेंडे हटवले.

महिलेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही

महिला त्यानंतर निघून गेली. ती महिला नक्की कोण? कुठून आली, याबाबत स्पष्ट माहिती नाही. स्थानिक नागरिकांच्या मते, ती मुस्लिम महिला दुसऱ्या स्थानकावरून आली होती. पोलिसांकडून अद्याप या घटनेबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT