Mumbai Sea Level Special Report Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Sea Level Special Report : फक्त १५ वर्ष, मुंबई बुडणार? धक्कादायक अहवाल आला समोर

Mumbai Sea Level News : फक्त १५ वर्ष, मुंबई पाण्याखाली बुडणार असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. बेंगळरुतील सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी या संस्थेने धक्कादायक अहवाल दिला आहे.

साम टिव्ही

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. 7 बेटांपासून तयार झालेली मुंबई पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती आहे. बेंगळरुतील सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी या संस्थेने यासंदर्भात एक महत्त्वाचा अभ्यास केला आहे. 2040 पर्यंत मुंबईतील10 टक्क्यांहून अधिक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता या अभ्यासात वर्तवण्यात आली आहे.

21व्या शतकाअखेरपर्यंत मुंबईतील समुद्राची पाणीपातळी 76.2 सेंमीपर्यंत वाढण्याची भीती या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. भारतातल्या किनारपट्टीवरील 15 शहरांनाही समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचा धोका असल्याचा इशारा CSTEPच्या अभ्यासात देण्यात आला आहे. 21व्या शतकाअखेरपर्यंत किनारपट्टीवरील सर्व शहरांमधील समुद्रपातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईची 10% जमीन पाण्याखाली जाणार?

21व्या शतकाअखेरपर्यंत मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. बेंगळुरुतील CSTEP संस्थेने हा धोका व्यक्त केला आहे. 2040पर्यंत मुंबईची 10% जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता अभ्यासात व्यक्त केली आहे. 2100पर्यंत समुद्रपातळी 76.2 सेमीपर्यंत वाढणार असल्याची माहिती अभ्यास मिळाली आहे.

समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचा धोका?

किनारपट्टीवरील १५ शहरांवर हवामान बदलाचा परिणामाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईला सर्वाधिक धोका आहे. मुंबईसहित चेन्नई, तिरुअनंतपुरम, कोची, पुरी, उडुपी, पारादीप, हल्दिया, कन्याकुमारी, पणजी,मंगळूर, कोझिकोड, थुथुकुडी, यानम आणि विशाखापट्टण शहरांतील पर्यावरणीय बदलांचे निरीक्षणे नोंदविण्यात आली आहे.

मुंबईतील शहरांमधील समुद्रपातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. २१०० पर्यंत मुंबईतील समुद्राची पाणीपातळी ७६.२ सेंटीमीटरपर्यंत वाढण्याची भीती आहे. यामुळे पाणी, कृषी, जंगल, जैवविविधता तसेच आरोग्य क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या ३४ वर्षांत वाढलेली पाणीपातळी (सेंटीमीटरमध्ये)

मुंबईः ४.४

कोचीः २.२१

हल्दियाः २.७२

विशाखापट्टण: २.३८

पारादीपः ०.७१

चेन्नईः ०.६७९

२१०० पर्यंत वाढणारी पाणीपातळी (सेंटीमीटरमध्ये)

मुंबईः ७६.२

उडुपीः ७५.३

मंगळूरः ७५.२

कोझिकोडः ७५.१

कन्याकुमारी:- ७४.७

कोचीः ७४.९

तिरुअनंतपुरम:- ७४.७

पणजीः ७५.५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT