थोड्याचं दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावणात महादेवाची आणि माता पार्वतीची पूजा व्रत केले जाते. अनेकजण श्रवाणातील सोमवार किंवा अन्य दिवशी उपवास करतात.
धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या उपवास करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. उपवासाच्या दिवशी अनेकजण फळांचे सेवन करतात ज्यामुळे शरीराला अनेक पोषक तत्वांचा लाभ मिळतो.
फळांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात ज्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. फळं खाल्ल्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया उपवास करण्याचे जबरदस्त फायदे.
उपवास केल्यामुळे शरीरातील ग्लुकोज, चरबी नियंत्रित होण्यास मदत होते, त्यामुळे आपल्या शरीरातील जळजळ कमी होते. त्यासोबतच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार, कोलेस्ट्रॉलची समस्या दोखील दूर होते.
उपवास केल्याने किडनीचे आरोग्य निरोगी रहाते. उपवास केल्यामुळे किडनीचे डिटॉक्सिफिकेशन होते आणि किडनीला काही काळ आराम मिळतो. किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग असल्यामुळे निरोगी रहाणे गरजेचे असते.
उपवास केल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते. पोट रिकामं राहिल्यामुळे मेंदूला अधिक रक्त प्रवाह उपलब्ध होतो ज्यामुळे तुमची बुद्धी तल्लख होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते.
आठवड्यातून एक दिवस उपवास केल्यामुळे तुमच्या शरीरात उर्जा निर्माण होते आणि ज्यामुले शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यासोबतच रोगप्रतिकाशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला संसर्ग होत नाही.
आठवड्यातून एकदा नियमित उपवास केल्यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि शरीरातील अतीरिक्त चरबी कमी होतो ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. वजन कमी झाल्यामुळे तुमचं शरीर निरोगी पहाण्यस मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By : Nirmiti Rasal