Mumbai Local News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Railway : रेल्वेचा मोठा निर्णय! पालघर जिल्ह्यात ७ नवीन रेल्वे स्टेशन उभारणार, गेमचेंजर प्रकल्प कधी पूर्ण होणार?

Western Local News : पश्चिम रेल्वेच्या डहाणू–विरार चौपदरीकरण प्रकल्पाला गती मिळाली असून पालघर जिल्ह्यात सात नवीन स्थानकांची उभारणी होणार आहे. हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होणार असून लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • डहाणू–विरार चौपदरीकरण प्रकल्पाला गती

  • पालघर जिल्ह्यात सात नवीन स्थानकांची उभारणी

  • प्रवासी व मालवाहतूक गाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक

  • 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता

पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते विरार रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे. पश्चिम रेल्वेकडून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर काम हाती घेण्यात आले असून, या प्रकल्पांतर्गत सात नवीन रेल्वे स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे डहाणूपर्यंत उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रकल्पांची उभारणी झाल्याने लोकसंख्येत वाढ झाली असून प्रवाशांची गर्दीही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने चौपदरीकरणासोबतच नवीन स्थानकांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सात स्थानकांमध्ये वाढीव, सुरतोडी, माकुणसार, चिंटू पाडा, पांचाली, वंजारवाडा आणि बीएसईएस कॉलनी या ठिकाणांचा समावेश आहे.

या प्रकल्पामुळे केवळ पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार नाही, तर डहाणू–विरार मार्गावरील रेल्वे वाहतूक सुलभ होऊन मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवांचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सध्या या मार्गावर उपलब्ध असलेल्या दोन रेल्वे ट्रॅकवरून गाड्या धावतात. मात्र, प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन मार्गांवरचा ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे प्रवाशांना नेहमी उशिरा पोहोचणे, गाड्यांची गर्दी, तसेच वेळापत्रकात होणारे बदल या समस्यांचा सामना करावा लागत आहे. चौपदरीकरणामुळे दोन ट्रॅक प्रवासी गाड्यांसाठी आणि दोन ट्रॅक मालवाहतुकीसाठी वापरले जाणार आहेत. त्यामुळे गाड्यांचा वेग आणि वेळापत्रक यामध्ये सुधारणा होईल.

डहाणूपर्यंत पश्चिम रेल्वेने चौपदरीकरण केल्यास पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे . दरम्यान, अनेक वर्षांपासून वाढत्या लोकसंख्येला आणि प्रकल्पांमुळे वाढलेल्या वाहतुकीला अनुरूप अशी सोय उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. अखेर रेल्वे प्रशासनाने या मागण्यांना प्रतिसाद दिला असून, डहाणू–विरार चौपदरीकरण आणि सात नवीन स्थानकांची उभारणी यामुळे येत्या काही वर्षांत प्रवाशांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai–Nanded Weekly Special Trains: सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई–नांदेड दरम्यान ४ विशेष गाड्या सुरू

पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात मोठा राडा; वकील आणि IPS महिला अधिकाऱ्यांची बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

Kalyan Traffic : कल्याण पोलिसांचा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय; नवरात्रौत्सव काळात जड वाहनांना बंदी

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी ५ जणांना पोलीस कोठडी

Maharashtra Investment : राज्यात ८०,९६२ कोटींची गुंतवणूक; ४०,३०० रोजगार निर्मिती होणार, कोणत्या जिल्ह्यांना थेट फायदा?

SCROLL FOR NEXT