Mumbai Western Local News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लोकल प्रवास होणार गर्दी मुक्त, आता १८ डब्यांची उपनगरीय रेल्वे धावणार

Mumbai Western Local News : मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी! पश्चिम रेल्वे १४ व १५ जानेवारी रोजी विरार–डहाणू मार्गावर १८ डब्यांच्या लोकल ट्रेनची पहिलीच ऐतिहासिक चाचणी घेणार आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये १८-डब्यांच्या लोकल ट्रेनची पहिलीच चाचणी

  • १४ आणि १५ जानेवारी रोजी होणार चाचणी

  • गर्दीच्या ताणातून सुटका आणि प्रवासी क्षमता वाढवणे मुख्य उद्दिष्ट्य

  • दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल सिस्टीम असलेल्या ट्रेनची सुरक्षा चाचणी करण्यात येणार

Western Railway Announces 18 Coach Mumbai Local मुंबईकरांसाठी नव्या वर्षातील मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रोजची वाढती गर्दी आणि लोकलवरील वाढता प्रवासाचा ताण पाहता रेल्वेने १८ डब्यांची लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे येत्या १४ आणि १५ जानेवारी रोजी विरार-डहाणू मार्गावर १८ डब्यांच्या उपनगरीय गाड्यांच्या चाचणी करणार आहे. भारतीय रेल्वेकडून इतक्या लांब लोकल गाड्यांची ही पहिलीच चाचणी असेल.

सध्या मुंबईकरांच्या सेवेत १२ आणि १५ डब्यांच्या लोकल गाड्या आहेत. त्यांच्या अधिकाधिक फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या. मात्र तरीही मुंबई लोकलची गर्दी अद्यापही जैसे थे आहे. वाढती गर्दी, लोकलवरचा वाढता ताण लक्षात घेऊन पश्चिम उपनगरीय रेल्वेने येत्या १४ आणि १५ जानेवारी रोजी पहिल्यांदाच १८ डब्यांच्या मुंबई लोकल ट्रेनची चाचणी घेणार आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वे नेटवर्कवर दररोज अंदाजे ७.५ दशलक्ष प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ३,००० हून अधिक लोकल ट्रेन असल्याने, अतिरिक्त क्षमतेच्या गाड्यांची गरज वाढत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, १८ डबे असलेल्या दोन वेगवेगळ्या लोकल ट्रेनची चाचणी घेतली जाईल.

एका ट्रेनमध्ये बॉम्बार्डियरची इलेक्ट्रिकल सिस्टीम असेल, तर दुसऱ्या ट्रेनमध्ये मेधाची इलेक्ट्रिकल सिस्टीम असेल. दोन्ही ट्रेनमध्ये अनिवार्य सुरक्षा चाचण्या घेतल्या जातील. या चाचण्यांमध्ये दोन महत्त्वाच्या सुरक्षा चाचण्यांचा समावेश असेल. आपत्कालीन ब्रेकिंग डिस्टन्स, ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन किती लवकर थांबू शकते हे तपासले जाईल. दुसरी कपलर फोर्स चाचणी असेल, जी ब्रेकिंग दरम्यान कोचना जोडणाऱ्या कपलरवर पडणाऱ्या दाबाचे मूल्यांकन करेल.

या चाचण्यांमध्ये आपत्कालीन ब्रेकिंग अंतर आणि कपलर फोर्स सारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. चाचण्या सुरू होण्यापूर्वी, वेग आणि स्थिरतेची पूर्तता करण्यासाठी डब्यांमध्ये बदल केले जातील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चाचण्या प्रायोगिक आहेत आणि याचा अर्थ असा नाही की, १८ डब्यांच्या लोकल ट्रेन मुंबईत लगेच सुरू केल्या जातील. या चाचण्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाचा भाग आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT