Mumbai News: मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाचं वृत्त हाती आलं आहे. मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन यामुळे २० मिनिटे उशिराने धावत आहे. गाड्या उशिराने धावत असल्याने कामानिमित्त लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या मालाड रेल्वे स्थानक ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेन उशिराने धावत आहे. या मार्गावर लोकल ट्रेन निर्धारित वेळेपेक्षा तब्बल २० मिनिटे उशिराने धावत आहेत . यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. (Mumbai Local train Update)
दुपारची वेळ असल्याने प्रवाशांना उकाड्याचा सामना देखील प्रवाशांना करावा लागत आहे. रेल्वे ट्रॅकवर सिग्न मध्ये बिघाड झाल्यामुळे हा विलंब होत असल्याचे प्राथमिक माहिती आहे. आरपीएफ, जीआरपी आणि पश्चिम रेल्वे सध्यातरी बिघाड दूर करण्यात गुंतली आहेत.
पश्चिम रेल्वेने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेने सांगितले की, 'सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास मालाड स्थानकाजवळ केबलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. पश्चिम रेल्वेची टीम ही यंत्रणा दुरुस्त करण्याच्या कामावर लागली आहे. ही सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त करू , असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.