mumbai water supply news Decision on water cut 1 October 2023 only after review meeting  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water News: मुंबईकरांवर पुन्हा पाणीकपातीचं संकट? तलावांमध्ये फक्त इतकाच पाणीसाठा; १ ऑक्टोबरला काय होणार?

Satish Daud

Mumbai Water Supply News Today: जुलै महिन्यात धो-धो बरसणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र राज्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंकट निर्माण झालं असून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. (Latest Marathi News)

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यातही अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. त्यामुळे येत्या महिनाभरात धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.

येत्या १ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका (Mumbai BMC) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठ्याचा आढावा घेणार आहे. यानंतर पाणीकपातीच्या निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो.

या आढाव्यानंतर पुढील वर्षभर मुंबईला कशा प्रकारे पाणीपुरवठा करण्यात येईल, याचं नियोजन केलं जातं. मुंबई शहराला मोडकसागर, भातसा, तानसा, मध्य वैतरणा आणि उध्र्व वैतरणा, या तलावांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा (Water Supply) केला जातो. या सातही तलावांची एकूण साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर इतकी आहे.

यंदा जुलै महिन्यात झालेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणारे बहुतांश तलाव काठोकाठ भरले होते. जुलै महिन्यात तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले होते. परंतु, संपूर्ण ऑगस्ट महिन्यात मुंबईकडे पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणक्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली.

परिणामी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धरणक्षेत्रात केवळ १३ लाख १२ हजार दशलक्ष लिटर म्हणजेच ९० टक्के एवढाच पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी २ सप्टेंबर रोजी सात तलावांचा मिळून एकूण जलसाठा ९७.५१ टक्के एवढा होता. मात्र, यंदा सध्या धरणक्षेत्रात मेअखेपर्यंत पुरेल एवढाच म्हणजे केवळ ९०.६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT