MUMBAI WATER CUT: BMC ANNOUNCES ADDITIONAL 15% WATER SUPPLY REDUCTION DUE TO PANJRAPUR PUMPING STATION WORK Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणी संकट! पुढील २ दिवस १५ टक्के अतिरिक्त पाणीकपात लागू; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Mumbai Water Cut News : पांजरापूर पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक कामामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये दोन दिवस १५ टक्के अतिरिक्त पाणीकपात लागू करण्यात आली आहे. बीएमसीने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

  • तांत्रिक कामामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये दोन दिवस १५ टक्के अतिरिक्त पाणीकपात लागू

  • बीएमसीने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

  • २८ जुलै सकाळी ९ ते २९ जुलै पहाटे ५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा उशिराने होण्याची शक्यता आहे

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पांजरापूर पंपिंग स्टेशनवर सुरू असलेल्या तांत्रिक कामामुळे दोन दिवस मुंबईतील काही भागांमध्ये १५ टक्के अतिरिक्त पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा अत्यंत जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकने दिलेल्या माहितीनुसार, पांजरापूर पंपिंग स्टेशनमधील ६.६ के.व्ही. पॅनेल बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम २८ जुलै रोजी सकाळी ९वाजल्यापासून २९ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे, मुंबईत आधीपासूनच १० टक्के पाणीकपात सुरू आहे. त्यात आजच्या तात्पुरत्या १५ टक्के अतिरिक्त कपातीमुळे अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा उशिराने होण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळ्यातही पाणीकपात कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या धरणांतील एकूण जलसाठा सुमारे ८८ टक्क्यांवर पोहोचला असून ही दिलासादायक बाब आहे. मात्र, पावसाची अनिश्चितता लक्षात घेता सध्याची नियमित १० टक्के पाणीकपात तातडीने मागे घेण्यात येणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, ऑक्टोबरपर्यंत पाणीकपात मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय अपेक्षित नाही. परतीच्या पावसाचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तरूण आपल्या देशाचे भविष्य आहेत, तरी तरुणांवर हल्ला का? - प्रियंका गांधी

Liver Health : सावधान! रोजच्या या सवयी तुमचे लिव्हर शांतपणे करत आहेत निकामी; वेळीच ओळखा धोका

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी 5 मिनिटांत बनवा कुरमुरा भेळ

नागपुरात तुफान पाऊस; एक तासात 110 मिलिमीटर पाऊस, 800 विद्यार्थी तीन ते चार फूट पाण्यात अडकले

Devendra Fadnavis : मोठी बातमी! CJP च्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

SCROLL FOR NEXT