Mumbai Water Supply Shutdown Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Supply : मुंबईत दोन दिवस पाणी पुरवठा बंद, कोणत्या ठिकाणी येणार नाही पाणी? वाचा

Mumbai News : बीएमसीद्वारे मुंबईत २४०० मिमी व्यासाची नवीन पाण्याची पाइपलाइन सुरू केली जाणार आहे. या अत्यावश्यक कामासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.

Yash Shirke

Mumbai Water Supply News : बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केली आहे. बीएमसीद्वारे पवई अँकर ब्लॉक आणि मरोशी वॉटर शाफ्ट दरम्यान २४०० मिमी व्यासाची नवीन पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही पाइपलाइन सुरु करण्यासाठी १८०० मिमी व्यासाची तानसा पूर्व आणि पश्चिम पाइपलाइन वेगळी केली जाणार आहे.

पाइपलाइनचे काम ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरु केले जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा निर्धार आहे. तब्बल ३० तास पाइपलाइनचे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे मुंबईत ५ आणि ६ फेब्रुवारी या दोन दिवशी भांडुप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे.

कोणत्या ठिकाणी पाणी पुरवठा बंद असणार?

१. एस वॉर्ड -

श्रीराम पाडा, खिंडी पाडा, तुलशेत पाडा, मिलिंद नगर, शिवाजी नगर, भांडुप (पश्चिम), गौतम नगर, फिल्टर पाडा, महात्मा फुले नगर, सर्वोदय नगर आणि आसपासच्या परिसरात पाणी येणार नाही. तर गांवदेवी टेकडी, टेंभी पाडा, एलबीएस रोड, सोनापूर जंक्शन ते मगतराम पेट्रोल पंपपर्यंतच्या भागात, भांडुप (पश्चिम), शिंदे मैदानच्या आसपासचा विभाग, प्रताप नगर मार्ग, फुले नगर हिल, हनुमान हिल, अशोक हिल या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

२. एल वॉर्ड -

कुर्ला दक्षिण भागात काजू पाडा, सुंदर बाग, नव पाडा, हलाव पूल, कपाडिया नगर, न्यू म्हाडा कॉलनी, पाइप लाइन रोड, एलबीएस मार्ग या ठिकाणी पाणी येणार नाही. कुर्ला उत्तर भागात ९० फीट रोड, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकी विहार मार्ग या भागांत पाणी पुरवठा बंद राहील.

३. जी नॉर्थ -

धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, दिलीप कदम रोड, जैस्मीन माइल रोड, माहीम फाटक, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास रोड, ६० फीट रोड, ९० फीट रोड, धारावी लूप रोड या ठिकाणी पाणी पुरवठा बंद असणार आहे.

४. के ईस्ट वॉर्ड

विजय नगर मरोल, मिलिट्री मार्ग, मरोळ गाव. चर्च रोड, हिल व्यू सोसायटी, कदमवाडी, ओमनगर, कांतीनगर, राज्यस्थान सोसायटी, सहार गाव येथे पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ, माहेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साल्वे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मापला डोंगरी नंबर १ आणि २, हनुमान नगर, शहीद भगत सिंह कॉलेनी, एअरपोर्ट रोड एरिया, सागबाग, मरोळ एमआयडीसी या भागात पाणी येणार नाही.

५. एच ईस्ट

बांद्रा टर्मिनस, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहराम पाडा, खेरनगर, निर्मल नगर या ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT