Mumbai Water Cut Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, 'या' भागातील पाणीपुरवठा १२ तास राहणार बंद

Mumbai News: बी. डी. पाटील मार्ग, वाशीनाका येथील गवाणपाडा, एच. पी. सी. एल. रिफायनरी इत्यादी, शेवटच्या भागास पाणीपुरवठ्यामधील दाबामध्ये सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई उपनगरातील काही विभागांत येत्या गुरुवारी पाणीपुरवठा संपूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. वाशी नाका येथे जलद्वार बसविण्याचे काम पालिकेच्या जल विभागाद्वारे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गोवंडी ,चेंबूर परिसरातील काही भागांत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे..

वाशीनाका येथे गुरुवार १३ जून रोजी एका जलद्वार बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत चेंबूर (chembur)आणि गोवंडी ,देवनारी ,मानखुर्द परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबई शहरातील काही विभाग हे पालिका यंत्रणेच्या एकदम शेवटच्या टोकाला आहेत. त्यामुळे त्या भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.

मुंबई (Mumbai)पूर्व उपनगरातील बी.डी.पाटील मार्ग आणि वाशीनाका येथील गवाणपाडा, एचपीसीएल रिफायनरी या भागांनाही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्या अनुशंगाने या भागातील पाणीपुरवठ्यामधील दाबामध्ये सुधारणा करण्यासाठी हे काम करण्यात येणार आहे. त्यात उद्या ७५० मीलिमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे पालिकेच्या एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या विभागांत पाणीपुरवठा राहणार बंद

एम पूर्व विभाग-

टाटा वसाहत

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड वसाहत

गवाणपाडा

टाटा पॉवर थर्मल प्लांट या विभागातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

एम पश्चिम वसाहत-

माहुलगाव

जिजामाता नगर

वाशी नाका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT