Mumbai Water Shortage News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आजपासून १० टक्के पाणी कपात; या भागांना बसणार फटका

Mumbai Water Shortage News: मुंबईमध्ये १० टक्के पाणीकपात होणार आहे. आजपासून ते ७ फेब्रुवारीपर्यंत ही पाणीकपात असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले.

Priya More

Summary -

  • मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू

  • २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान पाणीकपात

  • पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिमच्या देखभाल कामामुळे पाणीकपात

  • शहर आणि पूर्व उपनगरातील १२ वॉर्डमध्ये पाणी कमी दाबाने येणार

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये आजपासून १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. २७ जानेवारीपासून ते ७ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात आली आहे. मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरामधील ११ विभागांमध्ये पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथेली न्यूमॅटिक गेट सिस्टिमच्या वार्षिक परिक्षणाच्या कामासाठी ही पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबईतील १२ विभागांमधील अनेक ठिकाणी १० टक्के पाणीकपात होणार आहे. या पाणीकपातीमुळे पाणी कमी दाबाने येईल. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. याच कारणामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे पालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.

या विभागात १० टक्के पाणी कपात?

- ए वॉर्डमधील नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र.

- बी वॉर्डमधील संपूर्ण परिसर.

- सी वॉर्डमधील भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला परिसर.

- ई वॉर्डमधील संपूर्ण परिसर.

- एफ दक्षिण वॉर्डमधील संपूर्ण परिसर.

- एफ उत्तर वॉर्डमधील संपूर्ण परिसर.

- टी वॉर्डमधील मुलुंड पूर्व आणि पश्चिम परिसर.

- एस वॉर्डमधील भांडुप, नाहूर, कांजूर मार्ग आणि विक्रोळी पूर्व परिसर.

- एन वॉर्डमधील विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर परिसर.

- एल वॉर्डमधील कुर्ला पूर्व परिसर.

- एम वॉर्डमधील संपूर्ण परिसर.

- एम पश्चिम वॉर्डमधील संपूर्ण परिसर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP Health: सतत थकवा जाणवतोय? लो ब्लड प्रेशर तर नाही ना, वाचा प्रमुख लक्षणे, पाहा तज्ज्ञ काय सांगतात

Maharashtra politics : पुन्हा भूकंप होणार? शिंदेंची शिवसेना फुटणार? खासदाराच्या त्या दाव्याने राजकारणात खळबळ

Saree With Matching Mangalsutra Design: कोणत्या साडीवर कोणते मंगळसूत्र उठून दिसेल? हे आहेत लेटेस्ट आणि ट्रेडिंग 5 पॅटर्न

Homemade Paneer : बाजारात मिळणारे पनीर बनवा आता घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: केडीएमसीत हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना

SCROLL FOR NEXT