Marathi- Bhojpuri Language Row Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Marathi -Bhojpuri Language Row: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती केल्यानंतर आता सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', असं हा तरुण व्हिडीओत बोलताना दिसतोय.

Priya More
  • मुंबईत मराठी- भोजपुरी भाषेवरून नवा वाद

  • तरुणाचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल

  • ‘भोजपुरी बोला मगच जेवण मिळेल’ असे तरुण म्हणताना दिसतोय

  • रेल्वे कॅन्टीनमधील व्हिडिओवर मराठी माणसांचा संताप

संजय गडदे, मुंबई

महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणं सक्तीचं करण्यात आलं आहे. मराठीला विरोध करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. काही रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठीला विरोध केला. अशातच आता एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे मराठी माणसं संताप व्यक्त करत आहेत. रेल्वे कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एका तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण भोजपुरी भाषेत बोलताना दिसत असून रेल्वे कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ घेण्यासाठी भोजपुरी भाषेत बोलावे, असे वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', अशा आशयाचे वक्तव्य तरुणाने केल्याचे दिसून येते. तसेच मराठी भाषा येत नसेल तर मराठी माणसाला खाद्यपदार्थ देऊ नका, असेही तो म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील स्थानिकांच्या अधिकारांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

या व्हिडिओमध्ये तरुणाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेचा उल्लेख केल्याचेही दिसून येते. बाळासाहेब ठाकरे हे ‘हिंदूहृदयसम्राट’ होते की ‘मराठी सम्राट’ होते, असा सवाल त्याने केला आहे. यासोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबतही त्याने काही प्रश्न उपस्थित केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी संबंधित तरुणाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वारंवार होणाऱ्या वादावर चर्चा सुरू केली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठे चित्रित करण्यात आला?, कधीचा आहे? आणि व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण नेमका कोण आहे? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे व्हिडिओतील वक्तव्यांचा संपूर्ण संदर्भ समोर येणे आणि त्याची अधिकृत पडताळणी होणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमुळे रेल्वे कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ, ग्राहकांशी होणारे वर्तन आणि महाराष्ट्रातील मराठी भाषेचा वापर या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitafal khanyache Fayde: सिताफळ खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे कोणते?

Aadhaar Card Update : आधार कार्डवर नाव किंवा आडनाव बदलायचे आहे? UIDAI ची ही सोपी प्रक्रिया जाणून घ्या

Sleep Problems: रात्री गाढ झोप लागत नाही? 'या' ७ कारणांमुळे होऊ शकते झोप खराब; जाणून घ्या उपाय

Maharashtra News Live Update: फ्लाय ९१ ची नवी मुंबईतून सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

SCROLL FOR NEXT