FOOTBALLER YOGESH NEGI DIES ON BIRTHDAY IN HORRIFIC MUMBAI-VADODARA HIGHWAY CRASH, FRIEND ALSO KILLED Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : बर्थडेच्या दिवशीच काळाचा घाला; भरधाव कार अपघातात फुटबॉलपटू आणि तरुणीचा मृत्यू

Mumbai Vadodara Highway Accident News : मुंबई-वडोदा महामार्गावरील भीषण अपघातात फुटबॉलपटूसह त्याच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला. वाढदिवस साजरा करून परतताना भरधाव कार दुभाजकावर आदळल्याने ही दुर्घटना घडली.

Alisha Khedekar

  • फुटबॉलपटू योगेश नेगी याचा वाढदिवसाच्या दिवशीच भीषण अपघात

  • योगेशसोबत असलेल्या रिवेका जेकब हिचाही घटनास्थळीच मृत्यू

  • भरधाव कार दुभाजकावर आदळल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती

  • एक तरुण जखमी असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे

मुंबई-वडोदा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका फुटबॉलपटूचा आणि त्याच्या मैत्रिणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाढदिवस आटपून परत येताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात बदलापूर येथील रहिवासी असलेला फुटबॉलपटू योगेश नेगी (वय २६) याचा वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्याच्यासोबत असलेली मैत्रीण रिवेका जेकब (वय २४) हिचाही जागीच मृत्यू झाला. तर कारमालक अंगद गिल (वय २५) गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नेगीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिघे मित्र-मैत्रीण एकत्र आले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर ते बदलापूरच्या दिशेने कारने रवाना झाले. पहाटेच्या सुमारास मुंबई-वडोदा महामार्गावरील एरंजाड गावाजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग अत्यंत जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जोरात आदळली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचे इंजिन, चाके आणि इतर सुटे भाग रस्त्याच्या परिसरात दूरवर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र योगेश आणि रिवेका यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.या दुर्घटनेत अंगद गिल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

जगाला कॅन्सरला विळखा, WHOच्या अहवालानं जगभरात खळबळ

मंत्री महोदय जरा इथेही लक्ष द्या, रस्ते-वीज गुल, स्मार्ट सिटीच्या निव्वळ बाता

SCROLL FOR NEXT