Mumbai University Senate Elections Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai University Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित! मनसे- ठाकरे गटाकडून सरकारवर सडकून टीका

Mumbai University Senate Election: शिंदे फडणवीस सरकारने परिपत्रक काढून मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai News: आठवडाभरापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र आठ दिवस उलटत नाही तोच शिंदे फडणवीस सरकारने परिपत्रक काढून मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आहे. निवडणूका रद्द केल्याने मनसेसह ठाकरे गटाने शिंदे गटावर सडकून टीका करत ही लोकशाही आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या जाहिर करण्यात आलेल्या नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणुक येत्या १० सप्टेंबर,२०२३ रोजी होती. सर्व प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना या निवडणुकीस सरकारने दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या विशेष सभेत निर्णय घेऊन अनिश्चित काळासाठी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

शासनाच्या या निर्णयाचा शिवसेना ठाकरे गटाच्या माजी सिमेंट सदस्यांकडून जोरदार निषेध करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यावरुन सडकून टीका केली आहे. "सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत या हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे.." अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

ठाकरे गटाने केली टीका...

"मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली! निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे..." अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT