Wardha Crime: वर्ध्यात रेशनिंगच्या तांदळाचा काळाबाजार! दोघांना अटक; १४ लाख ४६ हजारांचा माल जप्त

रेशन दुकानातील तांदळाचा काळाबाजार करीत असल्याचे उजेडात येताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaamtv
Published On

चेतन व्यास, प्रतिनिधी...

Wardha Crime News: रेशन दुकानात वापरण्यात येणारा शासकीय तांदूळ विना परवाना गोदामातून वाहतूक करीत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई वर्ध्यातील कोल्ही शिवारात समुद्रपूर पोलिसांनी केली.

श्रीकांत प्रभाकर शिंगरु (२६) रा. हिंगणघाट, अंकित धर्मेंद्र कराडे (२६) रा. वाकधरा ता. वणी जि. यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गंभीर प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.(Crime News In Marathi)

Wardha Crime News
Ulhasnagar News : टोळक्याच्‍या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू; धक्का लागल्याच्या रागातून मारहाण

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्ही शिवारातील गोदामातून शासकीय तांदळाचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ कोल्ही शिवार गाठून वामण भाईमारे यांच्या शेतातील गोदामात छापा मारला.

यावेळी त्यांना मालवाहू गोदाम परिसरात उभा दिसला. पोलिसांनी चालकास ताब्यात घेत मालवाहूची पाहणी केली असता यात रेशनच्या तांदळाचे १४६ कट्टे आढळून आले. पोलिसांनी चालक व क्लिनरला परवान्याची विचारणा केली असता चालकाने कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले.

Wardha Crime News
Sambhaji Brigade News : संभाजी भिडेंच्या आजच्या व्याख्यानास विराेध, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पाेलिसांच्या ताब्यात

दोघांना अटक....

दरम्यान, रेशन दुकानातील तांदळाचा काळाबाजार करीत असल्याचे उजेडात येताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून मालवाहू वाहनासह तांदळाचे पोते असा एकूण १४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला. या धक्कादायक कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com