Mumbai University Senate Election Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai University Senate Election : ठाकरे गटाने पुन्हा रचला इतिहास! मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 ही जागांवर मिळवला विजय

Mumbai University Senate Elections 2024 : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची विजयी घौडदौड पाहायला मिळत आहे. या निडवणुकीत युवासेनेने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा निकाल आज निकाल जाहीर झाला आहे. मुंबई विद्यापीठांच्या १० नोंदणीकृत १० पदवीधारांच्या जागांकरिता मंगळवारी २४ सप्टेंबर २०२४ मतदान पार पडलं होतं. आज या निवडणुकांची मतमोजणी पार पडली आहे. या निवडणुकीत दहाही जागांवर ठाकरे गटाच्या युवासेनेने विजय मिळवला आहे.

मुंबई विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी झाली. या निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अभाविपमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. मुंबई विद्यापीठाच्या या १० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्र आणि ६४ बूथवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी मतदारांची एकूण संख्या १३,४०६ इतकी होती. या निवडणुकीसाठी एकूण मतदानाच्या फक्त 55 टक्के मतदान झालं होतं.

या निवडणुकीसाठी युवासेना आणि अभाविपने सर्व १० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने चार उमेदवार उभे केले होते. तर मनसेने एक उमेदवार रिंगणात उतरवला होता. तर शिंदे गटाने या निवडणुकीत सहभाग नोंदवला नव्हता. या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल युवासेनाच्या बाजूने लागला आहे. या निवडणुकीच्या ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ यांचा विजय झाला आहे. मयूर पांचाळ यांना ५३५० मते मिळाली आहेत.

पाच आरक्षित जागांवर उमेदवारांना मिळालेली उमेदवारांना मते

महिला प्रवर्ग

युवासेना - स्नेहा गवळी - ५९१४ मते

अभाविप - रेणुका ठाकूर - ८९३ मते

SC प्रवर्ग

युवासेना - शीतल शेठ देवरुखकर - ५४८९ मते

अभाविप -राजेंद्र सायगावकर - १०१४ मते

Obc प्रवर्ग

युवासेना - मयूर पांचाळ - ५३५० मते

अभाविप - राकेश भुजबळ - ८८८ मते

ST प्रवर्ग

युवासेना - धनराज कोहचडे - ५२४७ मते

अभाविप - निशा सावरा -९२४ मते

NT प्रवर्ग

युवासेना - शशिकांत झोरे - ५१७० मते

अभाविप -अजिंक्य जाधव - १०६६ मते

खुला वर्ग

युवासेना - प्रदीप सावंत

युवासेना - मिलिंद साटम

युवासेना - अल्पेश भोईर

युवासेना - परम यादव

युवासेना - किसन सावंत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT