मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर  Saam TV
मुंबई/पुणे

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (MCQ) पद्धतीने ऑनलाईन होणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबई विद्यापीठाने २०२१ च्या हिवाळी सत्र परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र ५ च्या परीक्षा १७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२१ दरम्यान होतील. या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (MCQ) पद्धतीने ऑनलाईन होणार आहेत.

सत्र ५ च्या काही परीक्षेचे वेळापत्रक व प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार

बीए (एमएमसी ), बीएमएस, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट ) , बीकॉम (बॅंकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट ), बीकॉम ( फायनान्स अँड मार्केटिंग ), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( कॉम्प्युटर सायन्स ), बीएस्सी ( बायोटेक्नॉलॉजी), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीएस्सी ( आयटी), बीएस्सी ( हॉस्पिटॅलिटी स्टडीज ), बीएस्सी ( एव्हीएशन) व बीएस्सी ( एरोनॉटिक्स) या पदवीच्या ५ व्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल तसेच या परीक्षेसाठी प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार आहे.

कला , वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र १ व ३, अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र पदवी परीक्षा सत्र ७, बीएड परीक्षा सत्र ३, विधी पदवी परीक्षा सत्र ५ व ९ या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्र जाहीर करण्यात येईल व याची प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार आहे. तसेच पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र ६ च्या बॅकलॉगच्या परीक्षा ७ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान होतील. तर पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर सत्र २ व ४ च्या बॅकलॉगच्या परीक्षा १ ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indrayani: इंदू आणि फंट्या गँगने बनवला मातीचा किल्ला, 'इंद्रायणी' मालिकेत साजरी होणार दिवाळी

Maharashtra News Live Updates: 'सहाव्यांदा दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार..' देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

Milid Devra News : वरळीत ठाकरे Vs देशपांडे Vs देवरा सामना रंगणार ?

SCROLL FOR NEXT