गोव्याच्या राजकारणात उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला रामराम

गोव्याचे माजी मुख्यमंत्री व गांधी घराण्याचे जवळचे असलेले काँग्रेसचे आमदार लुईझीन फालेरो यांनी आज आपण मोठी घोषणा करणार असल्याचा गाजावाजा केला होता.
गोव्याच्या राजकारणात उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला रामराम
गोव्याच्या राजकारणात उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला रामरामSaam TV
Published On

पणजी: गोव्याचे माजी मुख्यमंत्री व गांधी घराण्याचे जवळचे असलेले काँग्रेसचे आमदार लुईझीन फालेरो यांनी आज आपण मोठी घोषणा करणार असल्याचा गाजावाजा केला होता. काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामाही दिला. मात्र पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत काहीही सांगितले नाही. आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते तृणमूल पक्षामध्ये दाखल होणार असल्याची सर्वत्र जाहीर चर्चा होती. मात्र त्या चर्चांना फाटा देत आपण लवकरच आपला पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. तसेच आपण काँग्रेस पक्ष सोडलेला असला तरी आपण काँग्रेसमन आहे असे सांगून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे.

गोव्याच्या राजकारणात उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला रामराम
कर्करोगाशी झुंजणाऱ्या नागरिकाला बिल्डरचा 41 लाखांचा गंडा; फ्लॅट देतो म्हणून...

आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एडवोकेट यतीश नाईक, विजय पै, आनंद नाईक आदी काँग्रेसचा राजीनामा दिलेले पदाधिकारी उपस्थित होते. आपण कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार की नाही ते व कुठल्या पक्षात दाखल होणार आहे ते लवकरच तुम्हा लोकांना सांगू असेही पत्रकारांना त्याने सांगितले. २०१७ च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस कडे २१ आमदारांचं पाठबळ होतं व आपण त्या वेळी काँग्रेसच्या दिल्लीतील कायदा विभागाला विचारणा केल्यानंतर राज्यपालांना पत्र देण्याचे सांगितले. आपण पत्रही तयार केले होते मात्र गोव्यात असलेल्या काँग्रेसच्या निरीक्षकांनी आपणास राज्यपालांना पत्र देण्यास अडवले असे फालेरो यांनी सांगितले.

हे सांगण्यात साडेचार वर्षे का लागली? या प्रश्नाला मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आपण कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळवून दिला त्याच बरोबर गोव्याला राज्याचा दर्जा मिळून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com