Mumbai University Exams : विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थगित परीक्षा घेण्याची तारीख ठरली आहे. अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे शुक्रवारी मुंबई विद्यापीठाची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. (Latest Marathi News)
मात्र, आता यावर तोडगा काढण्यात आला असून स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा या सोमवारपासून (६ फेब्रुवारी) रोजी होणार असल्याची माहिती आहे. त्या स्थगित झालेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाईल. या परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठातील कोणत्या परीक्षा झाल्या
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरील बहिस्कार टाकण्यापूर्वी मुंबई विद्यापीठात (Mumbai University) २ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या १० परीक्षा सुरळीत पार पडल्या. त्यात एमए सत्र ४, एमए हिंदू स्टडीज, एमएस्सी सत्र ४, एमकॉम सत्र २ (सिबीजीस), एमकॉम सत्र २ (चॉईसबेस), एलएलबी सत्र ३, एलएलबी / बीएलएस सत्र ३ (५ वर्षीय ), एमकॉम भाग १ (वार्षिक), बी.व्होक. हेल्थ केअर सत्र ५, बी.व्होक. हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम सत्र ५ या परीक्षा काल झाल्या आहेत. त्यानंतर ३ व ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द झाल्या होत्या.
दरम्यान, आता स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाईल. या परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.