Sindhudurg : ठाकरे सरकारनं एकही योजना आणली नाही; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

. देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Slams Uddhav ThackeraySaam TV

सुशांत सावंत

Devendra Fadnavis News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'ठाकरे सरकारच्या काळात इथे एकही योजना आणली नाही. यांचे प्रेम बेगडी आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला. (Latest Marathi News)

सिंधुदुर्गातील भराडीदेवी यात्रेत भाजपने जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या सभेत उपस्थितांना संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'आंगणेवाडीला आई भराडीदेवीचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. आई भराडी देवी जेव्हा कॉल देते, जेव्हा असाच कॉल आम्हाला दिला. त्यामुळे आज दर्शन घेतले. भाजपचा (BJP) आज विस्तार झाला आहे. भाजपची ताकद काय आहे हे निवडणुकीत दाखवले आहे. निलेश राणे म्हणातात, हे खरे आहे. येथील आमदार आणि खासदार आमच्या युतीचा असेल'.

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray
Sharad Pawar : शरद पवार यांनी सांगितला भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा 'तो' किस्सा; म्हणाले...

'चिपी विमानतळाचे खरे श्रेय हे राणे साहेबांना द्यावे लागेल. काही लोकांनी दोन दोन वेळा उद्‌घाटन केले. काही लोकांनी एक वीट देखील रचली नाही आणि उद्‌घाटन केले. अडीच वर्ष जे सरकार होते त्यांनी एक गोष्ट केलेली दाखवावी. कोकणाने यांना इतके वर्ष आशीर्वाद पण जेव्हा काही देण्याची वेळ आली तेव्हा हे कसे वागले कोकणी जनतेने पाहिले, असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

विरोधाकांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'एकही योजना उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आणली नाही. यांचे प्रेम बेगडी आहे. रिफायनरी प्रकल्प आणणारा होतो तो आतापर्यंत तयार झाला असता. ही ग्रीन रिफायनरी होती. सर्वात मोठी गुंतवणूक होणार होती. तीन सरकारी कंपन्या ती गुंतवणूक करणार होते. पण यांनी लोकांना खोटं सांगून लोकांना भडकवलं. हे म्हणाले रिफायनरी झाली नाही, तर आंबे होणार नाही. सर्वात जास्त आंब्याची निर्यात जाम नगर म्हणजे गुजरातमधून होते. खोट बोलून बोलून चांगल्या प्रकल्पाला यांनी विरोध केला'.

'केरळ,कर्नाटक, गुजरातमध्ये हा प्रकल्प करायचा असा निर्णय केंद्राने घेतला. पण तुमच्या आशीर्वादाने आणि आई भराडी देवीच्या कृपेने हा प्रकल्प कोकणात राहिला. या ठिकाणी पंचताराकिंत हॉटेल व्हायला हवेत. आपले बीचेच हे गोव्या पेक्षा सूंदर आहे, असेही ते म्हणले.

'केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेऊ आणि व्यवस्था निश्चितपणे उभी करू. आमचा काजू पिकवणाऱ्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. रवींद्र चव्हाण, तुम्ही पुढाकार घ्या प्रकल्पाला पैसे सरकार देईल. आम्ही बजेट तयार करत आहोत, तुम्हाला काय हवे ते मागून घ्या, असे फडणवीस पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com