Narayan Rane News : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातील आंगणेवाडी येथे भाजपची आज जाहीर सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीविरोधात खोटा प्रचार करून कोकणाचं नुकसान केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर उद्धव ठाकरे यांनी कोकणात कोणताही प्रकल्प आला की फक्त त्याला विरोध करायचं एवढंच काम यांनी केलं, अशी टीका नारायन राणे यांनी केली. (Latest Marathi News)
दरम्यान, नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या भाषणात केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. मला उपमुख्यमंत्री शब्द बोलायला आवडत नाही तरीपण बोलावं लागतं, असं नारायण राणे म्हणाले. राणेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळल्याने भाजपच्या मनात अजूनही खदखद आहे का? असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे.
नारायण राणे काय म्हणाले?
गेल्या 33 वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काम कंलं. या 33 वर्षांत जिल्ह्यातील प्रत्येक घराघरात पोहोचलो आहे. प्रथम शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपमधून काम करत आहे. आता हा शेवटचा पक्ष आहे. आता कोणत्या पक्षात जाणार नाही, असं राणे म्हणाले.देवेंद्र फडणवीस हे भाजपामधील प्रमुख नेते आहे त्यांनी मुख्यमंत्री असताना विकासाची अनेक कामे केली आहेत. आता त्यांना मला उपमुख्यमंत्री शब्द बोलायला आवडत नाही तरीपण बोलावं लागतं, असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी जसा देश बदलत आहेत तसेच कोकण देखील बदलत आहे. हा जिल्हा विकास करेल. मात्र, काही जण मध्ये-मध्ये येत आहेत. बाळासाहेब ठाकरे जीवंत होते तोपर्यंत कोकणी माणसाने शिवसेना वाढवली. परंतु, अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी कोणकणासाठी काय केलं? कोकणात कोणताही प्रकल्प कोकणात आला की फक्त त्याला विरोध करायंचं एवढंच काम यांनी केलं, अशी टीकाही राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
फडणवीसांची ठाकरेंवर टीका
दरम्यान, उपमुख्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. रिफायनरीविरोधात खोटा प्रचार करून कोकणाचं नुकसान केलं. परंतु, भराडीदेवीनं आम्हाला कौल दिल्यामुळे आम्ही सत्तेत आलो आहोत. आता हा प्रकल्प आम्ही आणू. या प्रकल्पातून कोणतील तरूणांच्या हाताला रोजगार मिळेल. शिवाय या प्रकल्पामुळे पुढील 20 वर्षांची महाराष्ट्राची अर्थव्यस्था बळकट होईल. रिफायनरीच्या विरोधामुळं कोकणानं एक लाख रोजगार गमावला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.