Mumbai Underground Metro Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Underground Metro: मेट्रो लाईन ३ घडवणार इतिहास, आठ डब्यांसह धावणार स्वयंचलित मेट्रो, कसं आहे नवं तंत्रज्ञान?

Sandeep Gawade

Latest Mumbai News Updates: मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या लाईनच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी ठाण्यात येत आहेत. ८ डब्यांची मेट्रो चालवणारी भारतातील ही पहिली लाईन ठरणार आहे. महिलांसाठीही विशेष डब्याची सोय करण्यात आली आहे. दिल्लीत ८ डब्यांच्या मेट्रो चालवल्या जात असल्या तरी त्यांची लांबी कमी होती. त्यामुळे सध्या या प्रकल्पाची देशात जोरदार चर्चा सुरू आहे.

सुरुवातीला लाइन 3 वर धावणाऱ्या ट्रेन स्वयंचलित ट्रेन संरक्षण (ATP) मोडमध्ये चालवल्या जातील, ज्यामुळे स्वयंचलित ब्रेकिंगद्वारे सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल. दोन ते तीन महिन्यांत ही सिस्टीम स्वयंचलित ट्रेन ऑपरेशन (ATO) मोडमध्ये स्थलांतरित होईल. ज्यामुळे कमी मानवी हस्तक्षेपासह स्वयंचलित ऑपरेशन्स करता येतील आणि भविष्यात चालकविरहित ट्रेनसाठी मार्ग मोकळा होणार आहे.

प्रवाशाच्या सुरक्षेची, वेळीची काळजी

ट्रॅकच्या शेजारी असलेल्या मार्गावर सुरक्षित चालण्याची अनुमती असेल

स्थानके सुमारे 1 किमी अंतरावर आहेत, त्यामुळे प्रवासी दोन्ही दिशेला असलेल्या जवळच्या स्थानकापचा पर्याय निवडू शकतात.

आपतकालीन सिस्टिम लंडन, पॅरिस, बर्लिन, वॉशिंग्टन, सिंगापूर, दुबई, चीन आणि बँकॉक शहरांमध्ये वापरली जाते

भारतात सध्या कोलकाता, दिल्ली, हैदराबादमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

आठ डब्यांच्या ट्रेनमध्ये अंदाजे २,५०० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत

दोन स्टेशनमधील अंतरावर ठरणार तिकीट

सीप्झ (१.६ किमी) -- १० रुपये

एमआयडीसी अंधेरी (२.८ किमी)- २० रुपये

मारोल नाका (४.१ किमी)- २० रुपये

सीएसएमआयए टी-२ ( इंटरनॅशनल ५.१ किमी)- ३० रुपये

सहर रोड ( ६.० किमी)-- ३० रुपये

सीएसएमआयए टी-१ (डोमेस्टिक ७.७ किमी)--३० किमी

शांताक्रूझ (९.९ कमी)--४० रुपये

वांद्रे कॉलनी (१०.९ किमी)-४० रुपये

बीकेसी (१२.२ किमी)--५० रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी आरे कॉलनी ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान धावणाऱ्या १२ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत. या टप्प्यात एकूण १० स्थानके असणार असून मोदी महाराष्ट्रातील इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचंही उद्घाटन करणार आहेत. त्यात ठाणे क्रीक ब्रिज, ठाणे रिंग मेट्रो आणि मुंबई ते नागपूर जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचाही समावेश आहे. मेट्रो लाइनचा उर्वरित टप्ला मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असेल. कुलाबा-वांद्रे-सीप्ज मेट्रोच्या 33.5 किलोमीटर मार्गाचं 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय शहरी विकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तर कॉरीडोरचं काम 21 ऑक्टोबर 2016 पासून सुरु झालं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli News: 'रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असं काम', भाजप नेत्याची खासदार विशाल पाटलांवर जहरी टीका

Maharashtra Politics: भाजपचं मिशन महाराष्ट्र! केंद्रीय मंत्र्यांच्या टीमकडून पुण्यात सर्वे; नाशिकमध्ये गुप्त मतदान, पडद्यामागे काय घडतयं?

Pune Daund CCTV Accident : दोन ट्रकमध्ये अडकला; चालता बोलता कामगार जिवानिशी गेला, अपघाताचा थरार CCTVत कैद

Maharashtra News Live Updates: भाईंदरमध्ये मुलीचा व्हिडिओ काढणाऱ्याला मनसेने दिला चोप

Water Bottle Blue Cap: पाण्याच्या बाटलीचे झाकण निळ्या रंगाचंच का असतं? जाणून घ्या खरं कारण...

SCROLL FOR NEXT