Mumbai Local Train Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने; बदलापूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी

Mumbai train news today : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला असून वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने सुरु आहे.

Satish Daud

मुंबईसह उपनगरात आज सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साचत आहे. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला असून वाहतूक तब्बल अर्धा तास उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

बदलापूर रेल्वेस्थानकावर (Badlapur Railway Station) प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत येथून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्यात तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवासी ताटकळत उभे आहेत. त्यातच पावसाची संततधार सुरु असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

रेल्वे प्रशासनाने तातडीने वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. विशेष बाब म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वी देखील मध्य रेल्वेची वाहतूक (Mumbai Local Train) विस्कळीत झाली होती. रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने अनेक लोकलसेवा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मेगाहाल झाले होते.

अनेकांना तासनतास रेल्वेस्थानकावर अडकून पडावे लागले होते. आता सोमवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. सदैव प्रवाशांच्या सेवेत हजर असण्याचे आश्वासन देणाऱ्या रेल्वे प्रशासनाला प्रवाशांची खरंच काळजी आहे का? असा सवाल अनेकजण उपस्थित करत आहेत.

दुसरीकडे मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात (Mumbai Rain News) पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील दादर, लालबाग, परेल, हिंदमाता, चर्चगेट, सीएसटी या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम जाला आहे. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याचं समोर आलं आहे. येत्या काही तासांतच मुंबईत पावसाचा जोर वाढणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT