Mumbai Accident Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

Mumbai bhandup Accident : मुंबईच्या भांडुपमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव बसने अनेकांना चिरडल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

राज्यात अपघातांची मालिका सुरुच

भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात

या अपघातात चार जणांचा मृत्यू

मयूर राणे, साम टीव्ही

राज्यात अपघातांची मालिका सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना ताजी असताना मुंबईतही भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईत भांडुपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. मुंबईच्या भांडुप रेल्वे स्थानकाजवळ भरधाव बसने अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या स्टेशन बस डेपो जवळ बस खाली येऊन चार जणांचा मृत्यू झाला. कामावरून घरी जाणाऱ्या लोकांच्या वर्दळीदरम्यान हा अपघात झाला. भांडूप पश्चिम भागात बेस्ट बसने चार-पाच जणांना चिरडले. त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

भांडूप पश्चिम भागात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच परिसरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अपघातानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने अपघातात जखमी झालेल्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांची गर्दी पांगवली.

तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी कुर्ल्यातील पूर्व भागातही बेस्ट बसच्या भीषण अपघाताची घटना घडली होती. या बेस्ट बस अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज सोमवारी भांडुपमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. मुंबईतील वाढत्या बेस्ट बस अपघात चिंतेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kerala Next CM: केरळचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? काँग्रेसच्या 'या' ३ नेत्यांची नावं चर्चेत

West Bengal Results : पश्चिम बंगालचा निकाल बदलणार, ममता बॅनर्जींच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Morning mouth bitterness: सकाळी उठल्यावर तोंडात कडवटपणा का जाणवतो? कारण तुम्हालाही माहिती नसेल

Bhindi Bhaji Recipe: भेंडीची नेहमीची एकच चव, खाऊन बोअर झालात, ट्राय करा ही नवी युनिक रेसीपी

Election Result Live : केरळमध्ये UDF बहुमत पार! शशी थरूर म्हणाले, बदलाची गरज

SCROLL FOR NEXT