Mumbai traffic rules today : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या जाणवत आहे. त्यामुळे तासंतास अडकून बसावे लागते. मुंबईतील हीच वाढती वाहतूककोंडी (Mumbai traffic latest news) कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता १ फेब्रुवारीपासून शहरात नवीन वाहतूक नियम लागू करण्यात निर्णय घेतला आहे. (Mumbai traffic police new traffic rules February 2026)
शहरातील वाहतूककोंडीची कटकट संपवण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरातील वाहतुकीसाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांनुसार शहरात जड वाहनांच्या (Heavy vehicle ban in Mumbai) प्रवेशावर वेळेचे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शनिवारपासून हे नवे नियम लागू केले जात आहे. पाहूयात मुंबई वाहतूक पोलिसांनी नेमका काय निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे का? (Mumbai traffic congestion solution by traffic police)
नव्या आदेशानुसार, सकाळी ८ ते ११, सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत मुंबईत जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या वेळा वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक गजबजलेल्या असल्याने मोठ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढतो आणि कोंडी तीव्र होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दक्षिण मुंबईत (साऊथ मुंबई) नियम आणखी कडक असणार आहेत. सकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत सर्व जड वाहनांना पूर्ण बंदी असेल. फक्त अत्यावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. जड वाहनांना प्रवेश फक्त रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेतच मिळणार आहे. लक्झरी बसनाही या भागात बंदी राहणार आहे, मात्र अत्यावश्यक सेवा देणारी वाहने अपवाद असतील. (South Mumbai heavy vehicle entry restrictions)
मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेवर जड वाहनांना पूर्णतः बंदी राहील. फक्त बस सेवा याला अपवाद असणार आहेत. कोणती वाहने सुरू राहतील? खालील वाहनांना बंदीतून सूट देण्यात आली आहे. भाजीपाला, दूध, ब्रेड, बेकरी पदार्थ,पिण्याचे पाणी,पेट्रोल, डिझेल, रॉकेल, रुग्णवाहिका, शालेय बस, शासकीय व निमशासकीय वाह, लक्झरी बसना शहरात परवानगी असेल, मात्र दक्षिण मुंबईत नाही.
फक्त खासगी, भाड्याच्या किंवा अधिकृत पे- अँड-पार्किंगमध्येच वाहन लावता येईल. सार्वजनिक रस्त्यांवर पार्किंगला मनाई असेल. पाणी पुरवठा ठिकाणांजवळ फक्त दोन पाण्याचे टँकर थांबू शकतील. (New parking rules implemented in Mumbai city)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.